इम्युनिटी वाढवेल आणि व्हायरल इन्फेक्शनपासून ठेवेल दूर; आरोग्यासाठी उत्तम असा चहा

इम्युनिटी वाढवेल आणि व्हायरल इन्फेक्शनपासून ठेवेल दूर; आरोग्यासाठी उत्तम असा चहा

हा चहा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immunity booster tea) वाढवण्यास मदत करतो, असा दावा करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 एप्रिल : देशभरात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर (Health System) मोठा ताण आल्याचं दिसत आहे. ही सर्व स्थिती पाहता कित्येक लोक चिंतेत आहेत. सर्वच ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अशी सूचना सरकारने केली आहे. तसंच मास्कचा वापर, हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं कठोर पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. शिवाय कोरोना संसर्गापासून पासून बचाव व्हावा यासाठी रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यावर नागरिकांनी भर द्यावा असंही सांगितलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चहाप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आसाममधील चहा (Tea Of Assam) मदत करू शकतो, असं सांगितलं जातं आहे.

भारतात काळ्या चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. ग्रीन टीमध्ये (Green Tea) दुधाचा वापर केला जात नाही. परंतु काळ्या चहामध्ये दूध टाकल्यास त्याला हलका लाल रंग येतो. यामुळे त्याला लाल चहा असं म्हणतात. लाल चहा शरीरातील सूज, फ्लू, फुफ्फुसं आणि श्वसनमार्गाचा विषाणू आणि जिवाणू संसर्गापासून बचाव करतो, असं अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे.

हे वाचा - खास Vitamin घेणाऱ्या महिलांना कोरोनाचा धोका कमी आहे?

आसाममधील मळ्यांमध्ये उत्पादित होणारा काळा चहा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या चहात थिफ्लेविन्स नावाचं द्रव्य असते. हे द्रव्य इन्फ्लुएन्झा, श्वसन विकार टाळण्यास शरीराला मदत करते. काळ्या पानांपासून तयार होणारा लाल चहा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो, असा दावा आसाममधील चहा संशोधन केंद्राने केला आहे.

हे वाचा - पोटावर झोपल्याने खरंच शरीरातील Oxygen पातळी वाढते का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा व्हावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष मंत्रालय (Aayush Ministry) रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय जारी करत आहे. आपल्या सूचनांमध्ये आयुष मंत्रालयाने काढा, तुळशीचा चहा, गरम पाण्याचे सेवन यासारख्या घरगुती उपचारपद्धती सामान्य लोकांसाठी शेअर केल्या आहेत. जर नियमित आणि योग्य प्रमाणात लाल चहाचं सेवन केलं तर श्वसन विकारांपासून बचाव होऊ शकतो. कोरोनाचे विषाणू पहिला हल्ला श्वास नलिकेवर करतात. त्यामुळे हे घरगुती उपचार फायदेशीर ठरू शकतात.

First published: April 23, 2021, 7:32 AM IST

ताज्या बातम्या