• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पोटावर झोपल्याने खरंच शरीरातील Oxygen पातळी वाढते का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

पोटावर झोपल्याने खरंच शरीरातील Oxygen पातळी वाढते का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा (oxygen) तुटवडा असताना पोटावर झोपून ऑक्सिजन वाढवण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 एप्रिल : एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची (Oxygen) गरज पडत आहे आणि अशात आता ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळावं यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरूच आहेत. याचदरम्यान सोशल मीडियावर एका व्हिडीओसुद्धा व्हायरल होतो आहे. ज्यात पोटावर झोपल्याने शरीरातील  ऑक्सिजनची पातळी वाढल्याचं (lying on stomach improve oxygen levels) दाखवण्यात आलं आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्याचा उपाय सांगणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्ती आपल्या पोटावर (prone position improve oxygen levels) झोपते. तिने हाताला ऑक्सिमीटर लावलं आहे. सुरुवातीला या व्यक्तीच्या ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी दिसून येईल पण जेव्हा ही व्यक्ती पोटावर किंवा छातीवर उलटी झोपते तेव्हा या ऑक्सिमीटरमधील आकडेही वाढतात. म्हणजेच शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. आता हा व्हिडीओ पाहून खरंच असं होतं? असा प्रश्न पडतोच. पोटावर झोपल्याने किंवा अशा स्थितीत झोपल्याने खरंच शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आहे. असेल तर यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत न्यूज 18 ने याबाबत तज्ज्ञांशी संवाद साधला. दिल्लीच्या BLKC सेंटर फॉर क्रिटिकल केअरचे वरिष्ठ संचालक डॉ. राजेश पांडे यांनी सांगितलं, "पोटावर रुग्णाला झोपावून ऑक्सिजनची पातळी वाढवणं हा काही हॅक नाही. हा वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेला एक प्रयोग आहे. अशा पद्धतीने रुग्णाला झोपवल्याने ऑक्सिजनचा स्तर बदलतो" हे वाचा - फक्त हवेवर अवलंबून राहू नका; तर आहारामार्फतही वाढवा शरीरातील ऑक्सिजन पातळी "ही वैज्ञानिक पद्धत डॉक्टर गेल्या दहा वर्षांपासून वापरत आहेत. कोरोनाआधी सामान्यपणे श्वास घ्यायला गंभीर त्रास होत असलेल्या किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत वापरण्यात आली. आम्ही त्यांना अशा परिस्थितीत 16 तास पोटावर झोपवून ठेवतो. पण कोरोना महासाथीत सुरुवातीला असं केलं जात नव्हतं. आता कोरोना संकटात ऑक्सिजनची कमतरता असल्याने पोटावर झोपवणं ही आदर्श स्थिती बनवली आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रित करता येऊ शकते", असं डॉ. पांडे म्हणाले. हे वाचा - 'गर्लफ्रेंडला भेटायचंय, कोणतं स्टिकर वापरू?', मुंबई पोलीस काय म्हणाले वाचा अशा स्थितीत फुफ्फुसाला ऑक्सिजन जास्त पोहोचतं. पण यामुळे धोकासुद्धा आहे. श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या कोणत्याही किंवा प्रत्येक रुग्णाला असं करायला सांगू शकत नाही. आमच्याकडे ऑक्सिजन देण्याच्या दोन पद्धती असतात. एक तर आक्रमक व्हेंटेलेशन पद्धत आणि दुसरी म्हणजे बिगर इनवेसिव्ह व्हेंटिलेशन पद्धत जिथं मास्क लावला जातो. ज्या रुग्णांना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवलं जातं, तिथं ही पद्धत वापरली जाते. रुग्णालयात कमी स्टाफ आणि रुग्णांची जास्त संख्या यामुळे हे तसं अशक्यच आहे. त्यामुळे होम आयोसेलेशनमध्ये असलेल्या सौम्य लक्षणांच्या रुग्णांना असं करण्यास हरकत नाही, असा सल्लाही डॉ. पांडे यांनी दिला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: