मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /साखरेला पर्याय असलेलं Artificial sweeteners खरंच वजन कमी करण्यात मदत करतं?

साखरेला पर्याय असलेलं Artificial sweeteners खरंच वजन कमी करण्यात मदत करतं?

शरीराचे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे आणि ते कमी करण्याच्या नादात घाईघाईने काही गोष्टी केल्या तर अनेकवेळा नवीन समस्या उद्भवू शकतात. आर्टिफिशियल स्वीटनर्स विषयीही असेच काही प्रश्न आहेत.

शरीराचे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे आणि ते कमी करण्याच्या नादात घाईघाईने काही गोष्टी केल्या तर अनेकवेळा नवीन समस्या उद्भवू शकतात. आर्टिफिशियल स्वीटनर्स विषयीही असेच काही प्रश्न आहेत.

शरीराचे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे आणि ते कमी करण्याच्या नादात घाईघाईने काही गोष्टी केल्या तर अनेकवेळा नवीन समस्या उद्भवू शकतात. आर्टिफिशियल स्वीटनर्स विषयीही असेच काही प्रश्न आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 नोव्हेंबर : निरोगी शरीरासाठी वजन व्यवस्थापन आवश्यक आहे. लठ्ठपणा मधुमेह, हृदयाची समस्या, उच्च कोलेस्ट्रॉल यांसारखे अनेक आजार घेऊन येतो. त्यामुळे वेळीच त्यावर नियंत्रण ठेवणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. शरीराचे वजन वाढवण्याच्या कारणांचा विचार केला तर पहिले नाव समोर येते ते म्हणजे “गोड”. चहा-कॉफीपासून ते केक-पेस्ट्रीपर्यंत, हे गोड पदार्थ दैनंदिन आहाराचा एक मोठा भाग बनले आहेत.

आता आर्टिफिशियल स्वीटनर्स त्याचा पर्याय पर्याय बनू पाहतायत. होय! आर्टिफिशियल स्वीटनर्सना अस्पार्टम, स्टीव्हियोसाइड आणि सुक्रॅलोज सारखे नॉन-न्यूट्रिटिव्ह स्वीटनर म्हणतात, जे सामान्य साखरेपेक्षा वेगळे असतात. त्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, जागतिक स्तरावर त्याच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आर्टिफिशियल गोड पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानत असाल. तर ते खरोखर वजन कमी करण्याच्या मोहिमेत तुमचे मित्र बनू शकतात का? हे पाहा.

Virat Kohli सह कित्येक सेलिब्रिटीज पितात ब्लॅक वॉटर, इतकं काय आहे त्यात खास?

वजन कमी करण्यासाठी आर्टिफिशियल स्वीटनर किती उपयुक्त आहेत

- मेडिकल न्यूज टुडे डॉट कॉमच्या मते, अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, आर्टिफिशियल गोड पदार्थ शरीराचे वजन वाढवण्याचे काम करतात, तसेच त्यांच्या सेवनाने हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार देखील होऊ शकतात.

- त्यांच्या सेवनाने आतड्यांतील जीवाणूंचा त्रास होतो, त्यामुळे चयापचय बिघडते आणि भूकही मंदावते. अनेकदा यामुळे भूक वाढणे आणि जास्त अन्न खाणे या समस्या निर्माण होतात.

- हे कृत्रिम गोड पदार्थ थोड्या काळासाठी वजन नियंत्रित करू शकतात, परंतु दीर्घकालीन त्याचे सेवन केल्यास ते केवळ लठ्ठपणाचे कारण बनतात. त्याचा परिणाम बहुतेक कंबरेभोवतीच्या भागावर होतो.

- अनेक स्त्रिया आणि मुलांवर केलेल्या संशोधनात असेही दिसून आले आहे की, गर्भधारणेदरम्यान आईने आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतल्याने बाळाचे वजन आणि चयापचय यावर नकारात्मक परिणाम होतो.

विराट कोहलीच्या फिटनेसचं रहस्य माहिती आहे का? जाणून घ्या त्याच्या ‘वेगन डाएट’ बद्दल

डॉक्टरांच्या मते, याला एक चांगला पर्याय म्हणता येणार नाही उलट एक नवीन आणि मोठी समस्या आहे. वजन वाढण्याशी त्याचा असलेला संबंध, त्याचा वापर टाळण्याची सूचना देतो. हल्ली विविध प्रकारचे पॅकेज केलेले आणि फास्ट फूडमध्ये वापरले जाते, मात्र वजन कमी करण्यासाठी अशा अन्नापासून दूर राहणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight, Weight loss tips