मुंबई, 05 नोव्हेंबर :ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे. या स्पर्धेत भारताच्या विराट कोहलीनं आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश विरुद्धची मॅच जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. या मॅचदरम्यान कोहलीचा फिटनेस पाहून अनेकांना त्यावर विश्वास बसणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, कोहलीच्या या फिटनेसचं रहस्य तो घेत असलेल्या ‘वेगन डाएट’मध्ये आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.
विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. त्याच्या फिटनेसचं रहस्य हेल्दी फूड आणि वर्कआउट्स हे आहे. तो त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच सतर्क असतो. क्रिकेटच्या मैदानावरील त्याची फील्डिंग आणि बॅटिंगच्या प्रेमात अनेकजण पडतात. म्हणूनच त्याची गणना भारतातील बेस्ट फील्डरमध्ये केली जाते. कोहलीच्या चाहत्यांना नेहमी त्याच्या डाएट प्लॅनबद्दल जाणून घ्यायचं असतं. विराट कोहलीनं देखील त्याच्या फिटनेसचं रहस्य उघड करताना स्वतःचा डाएट प्लॅन शेअर केला आहे.
हेही वाचा - Virat Kohli सह कित्येक सेलिब्रिटीज पितात ब्लॅक वॉटर, इतकं काय आहे त्यात खास?
असा आहे विराटचा डाएट प्लॅन
विराट कोहलीनं एका मुलाखतीत स्वतःच्या डाएट प्लॅनबाबत माहिती दिली होती. त्यानं या वयातही स्वतःला तंदुरुस्त आणि अॅक्टिव्ह ठेवणाऱ्या 7 गोष्टी सांगितल्या होत्या. तो म्हणाला होता, ‘माझ्या आहारात दोन कप कॉफी, मसूर, क्विनोआ, भरपूर पालक, भरपूर भाज्या, अंडी आणि डोसा या पदार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय मी बदाम, प्रोटिन बार आणि कधीकधी चायनीज फूडही खातो.’
कोहली पितो खास प्रकारचं पाणी
कोहली एक खास प्रकारचं पाणी देखील पितो. ज्याला ‘अल्कलाइन वॉटर’ म्हणतात. हे नैसर्गिकरित्या बायोकार्बोनेट असलेलं पाणी आहे. याचा खुलासा कोहलीनं नुकताच सोशल मीडियावर केला होता. त्यानं सांगितलं की, ‘मी घरी फक्त अल्कलाइन वॉटर पितो.’ तसेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यानं सांगितलं की, ‘मी अनेक वेळा ब्लॅक वॉटर पिले आहे. पण मी ते नियमितपणे पीत नाही. मी घरी फक्त अल्कलाइन वॉटर पितो.’
विराट आहे शाकाहारी
विराट कोहली कधीही त्याच्या आहारात साखर आणि ग्लुटेनयुक्त पदार्थांचा समावेश करत नाही. त्याचबरोबर तो दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का दोघेही शाकाहारी आहेत. विराट भूक लागल्यावर फक्त 90 टक्के अन्न खातो. तो वर्कआउट करायला मागेपुढे पाहत नाही.
क्रिकेटच्या मैदानावर विराटचा फिटनेस पाहून अनेकांना त्याच कौतुक वाटतं. पण या फिटनेससाठी तो खूप मेहनत घेतो, हे देखील लक्षात ठेवायला हवं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vegan, Virat kohali