जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अजब प्रेम की गजब कहाणी! बॉयफ्रेंडला पाहताच Doggy होते ही तरुणी

अजब प्रेम की गजब कहाणी! बॉयफ्रेंडला पाहताच Doggy होते ही तरुणी

अजब प्रेम की गजब कहाणी! बॉयफ्रेंडला पाहताच Doggy होते ही तरुणी

सध्या सोशल मीडियावर एका कपलच्या विचित्र रोमान्सची र्चा सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 09 मे : प्रेमात (Love) प्रेमी काय काय करतील याचा नेम नाही. अशा बऱ्याच विचित्र आणि अजब प्रेमकथा (****Love story) अनेकदा पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कपलच्या (Couple) प्रेमाची चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये बॉयफ्रेंडला पाहता गर्लफ्रेंड चक्क डॉगी बनते (Woman behave like doggy). अगदी हुबेहूब डॉगीसारखीच ही तरुणी वागू लागते. महत्त्वाचं म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडलाही (Woman romance with boyfriend like doggy) यामुळे काही हरकत नाही. तोसुद्धा तिला साथ देतो. एरिझोनाच्या टक्समध्ये राहणारी 26 वर्षांची ढाणी आणि तिचा 31 वर्षांचा बॉयफ्रेंड जॅक यांचा हा अनोखा रोमान्स चर्चेत आहे. ढाणीला आपल्या पार्टनरसोबत कुत्र्यासारखं राहायला आवडतं. ती त्याच्यासारखंच भुंकते, त्याच्यासारखंच उड्या मारते, त्याच्यासारखीच हाताचेही पाय करून चार पायांवर चालते.

जाहिरात

सामान्यपणे कपल जेव्हा बाहेर फिरतं तेव्हा एकतर ते एकत्र चालतात, हातात हात धरून चालतात, खांद्यावर हात टाकून चालतात किंवा कमरेत हात घालून चालतात. पण जॅक आणि ढाणीच्या बाबतीत यातलं काहीही होत नाही. कुत्र्याच्या गळ्यात जसा पट्टा बांधलेला असतो तसाच ढाणीच्या गळ्यातही आहे. हा पट्टा तिलाही आवडतो. हा पट्टा म्हणजे तिचा दागिना म्हणायला हरकत नाही. इतर मुलींना कपडे, दागिने हवे असतात. पण ढाणीला चेन आणि रंगबेरंगी पट्ट्यांची आवड आहे. हे वाचा -  VIDEO : मला लग्न करायचं आहे! भलताच हट्ट करत बाबासमोर ढसाढसा रडली चिमुकली लेक जॅक आणि ढाणी जेव्हा बाहेर फिरायला जातात तेव्हा दोघं इतर प्रेमीयुगुलाप्रमाणे किंवा कपलप्रमाणे हातात हात धरून किंवा खांद्यावर हात ठेवून चालत नाहीत. तर जॅकच्या हातात ढाणीच्या गळ्यातील पट्टा असतो. कुत्र्याला जसा त्याचा मालक हातात पट्टा धरून फिरायला नेतो.  तसं जॅक ढाणीच्या गळ्यातील पट्टा आपल्या हातात धरून तिच्यासोबत फिरायला जातो. यावेळीसुद्धा ढाणी दोन नाही तर चार पायांवरच चालते. ढाणी जॅककडून काही हवं असेल तर ती कुत्र्यासारखंच भुंकते आणि मागते. तसंच जॅकसमोर उड्या मारते आणि तिला जे काही हवं आहे त्याकडे ती इशारा करते. हे वाचा -  अरे बापरे! लेकीच्या डोक्यात उवा झाल्या म्हणून आईला पाठवलं तुरुंगात या कपलचं टिकटॉक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे. जिथं त्यांचे बरेच व्हिडीओ आहेत. त्यांच्या या विचित्र रोमान्सचे व्हिडीओ पाहून नेटिझन्स त्यांच्यावर टिका करतात. पण या कपलला त्याचा फरक पडत नाही. ढाणीला असा रोमान्स आवडतो आणि एक पार्टनर म्हणून तिची आवड जपणं हे आपलं कर्तव्य आहे, असं जॅक सांगतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात