मुंबई, 30 नोव्हेंबर : ब्रेडवर लोणी आणि तूप लावून खाणारे आपल्यापैकी बरेच जण आहेत. पोळ्यांवरही तूप लावल्याने छान सुगंध येतो आणि कोरड्या होत नाहीत. बरेच लोक गरमागरम पोळीवर मस्तपैकी तूप लावून खातात. ही त्यांची रोजचीच सवय असते. मात्र काही लोक असेही आहेत ज्यांना पोळीवर तूप लावून खाणे आवडत नाही किंवा चुकीचे वाटते. आज आपण जाणून घेऊया पोळीवर तूप लावून खाणे आपल्या आरोग्या साठी फायदेशीर असते का? अनेक बी-टाउन सेलेब्स रिकाम्या पोटी एक चमचा तूप घेऊन दिवसाची सुरुवात करतात. तज्ञांच्या मते, हे पेशींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत सुधारणा करून शरीराच्या उपचार प्रक्रियेत ते मदत करते. मात्र पोळीवर तूप लावून खाणे सुरक्षित आहे का? त्याचे काय फायदे आहेत आणि पोळीला किती तूप लावावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे न्यूट्रिशनिस्ट आंचल सोगनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहेत.
Aluminum Foil Use : अन्न गरम-ताजं ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईल सोयीचं वाटतं, पण ते सुरक्षित आहे का?पोळीवर तूप लावणे फायदेशीर आहे का? न्यूट्रिशनिस्ट आंचल यांच्या पोस्टनुसार, चपातीवर तूप ही एक आरोग्यदायी सवय आहे, मात्र ते मर्यादित प्रमाणात वापरावे. मर्यादित प्रमाणात तूप खाणे तुमच्या एकंदर आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असतो. तेव्हा आपण आपल्या आहारातून तूप पूर्णपणे काढून टाकण्याचा विचार करतो. पण ही पद्धतही चुकीची आहे.
पोळीवर तूप लावून खाण्याचे फायदे तूप पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यास मदत करते. यासह ग्लायसेमिक इंडेक्स किंवा GI कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांसाठी एक प्रणाली तयार करते. जेव्हा तूप असलेले अन्न खाल्ले जाते तेव्हा ते ग्लुकोजच्या पातळीवर झपाट्याने परिणाम करते. यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्याही डिशमध्ये तूप टाकून खाल्ल्यास त्याची चव दुप्पट होते. तूप खाल्ल्याने दिवसभरात चरबीयुक्त पदार्थ खाण्याची गरज वाटत नाही. तुपामध्ये फॅट व्हिटॅमिन असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. हे हार्मोन्स संतुलित करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल राखण्यास देखील मदत करते. तुपातील शक्ती शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सची निर्मिती रोखते.
दुधासोबत जिलेबी; ऐकायला विचित्र पण आरोग्यासाठी एक नंबर आहे हे कॉम्बिनेशनपोळीला किती तूप लावावे? तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे खरे आहे, परंतु असे बरेच लोक आहेत जे पोळीवर खूप जास्त तूप लावतात. आम्ही तुम्हाला सांगतो की एका रोटीवर एक छोटा चमचा तूप लावावे. यापेक्षा जास्त तूप शरीरासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)