नवी दिल्ली, 11 जून : शरीराच्या सर्व अवयवांच्या योग्य कार्यासाठी अँटिऑक्सिडंट्स खूप महत्त्वाचे आहेत. अँटिऑक्सिडंट संयुगे काही पदार्थांमध्ये आढळतात आणि ते शरीरात तयार होतात. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स म्हणून ओळखल्या जाणार्या अनेक हानिकारक रेणूंपासून शरीराचे रक्षण करतात. कधीकधी काही जुनाट आजारांमुळे क्रॉनिक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होण्याचा धोका वाढतो. यामुळे रक्तातील अँटिऑक्सिडंट पातळी निरोगी राहते. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणार्या नुकसानापासून काही विशिष्ट अँटिऑक्सिडंट-समृद्ध पदार्थांचे सेवन करून आपण संरक्षण करू शकता. याव्यतिरिक्त, हे पदार्थ रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत (Antioxidant Foods Benefits) करतात. अँटिऑक्सिडेंट्स युक्त पदार्थांचे सेवन करण्याचे फायदे StylesAtlife.com मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, व्हिटॅमिन सी, ई, सेलेनियम, झिंक, कॉपर यांसारख्या अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यात कार्डिओप्रोटेक्टिव्ह एक्टिविटी होत असतात. हृदयरोगांपासून संरक्षण करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले अन्न सेवन केल्याने संज्ञानात्मक आरोग्य देखील चांगले राहते. त्यामुळे स्मृतिभ्रंश, स्मरणशक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवत नाहीत. त्यांचे सेवन केल्याने मेंदू निरोगी राहतो, त्याचे कार्य योग्यरित्या पार पडते आणि मज्जासंस्था अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते. हे वाचा - पुरुषांनी नक्की घ्यायला हव्यात या लसी; गंभीर आजारांचा राहत नाही धोका अँटिऑक्सिडंट्स भरपूर असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास संधिवात होण्याची शक्यता कमी असते. Lutein आणि Zeaxanthin नावाचे अँटिऑक्सिडंट्स वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशनपासून संरक्षण करतात, तसेच इतर दृष्टी-संबंधित समस्या टाळतात. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि तरुण राहण्यासही मदत होते. अँटिऑक्सिडंट्स असलेले अन्न तुमचे यकृताचे कार्य सुधारू शकतात आणि यकृताच्या आजारांपासून संरक्षण करू शकतात. हे वाचा - Diabetes असेल तर या भाज्या चुकून पण खायच्या नसतात; कंट्रोलमध्ये नाही राहणार शुगर अँटिऑक्सिडंट्स समृद्ध पदार्थ कोणते - -अक्रोड, पेकान, चेस्टनट सारखे ड्रायफ्रुट्स - बेरीमध्ये स्ट्रॉबेरी, गोजी बेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी यांचा समावेश होतो. - लाल किंवा जांभळा कोबी - सोयाबीन, काळे बीन्स - गडद चॉकलेट्स - लाल, काळी, हिरवी द्राक्षे - विविध प्रकारच्या डाळी - पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या - बीट, ब्रोकोली, रताळे - गाजर, ग्रीन टी, कॉफी - संपूर्ण धान्य - सफरचंद, टोमॅटो, डाळिंब, द्राक्षाचा रस मसाले आणि औषधी वनस्पती इत्यादींमध्येही अँटिऑक्सिडंट्स असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.