नवी दिल्ली, 09 जून : पुरुषांनी आपल्या आरोग्याबाबत नेहमी सतर्क राहायला हवे. काही रोग आहेत ज्यामुळे पुरुषांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या धावपळीच्या जीवनात बहुतेक नोकरदार तसेच व्यावसायिक पुरुष त्यांच्या आरोग्याकडं लक्ष देऊ शकत नाहीत. सतत चुकीचा आहार घेतल्यामुळे शरीरात अशक्तपणा येण्याची शक्यता असते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की शारीरिक दुर्बलतेमुळे लैंगिक शक्तीवरही परिणाम होऊ लागतो. अशा परिस्थितीत पुरूषांनी नेहमी निरोगी राहायचे असेल तर काही लसी घ्यायला हव्यात. कोणत्या लसी गरजेच्या आहेत त्याविषयी जाणून (Vaccines For Men) घेऊया. याबाबत झी न्यूज ने माहिती दिली आहे. पुरुषांनी या लसी घेणे आवश्यक - हिपॅटायटीस बी लस - हिपॅटायटीस बी ही लस तीन डोसमध्ये दिली जाते. दुसरा डोस पहिल्या डोसच्या एक महिन्यानंतर आणि तिसरा डोस पहिल्या डोसच्या चार महिन्यांनंतर दिला जातो. हिपॅटायटीस बी विषाणू एखाद्या व्यक्तीचे चुंबन घेतल्याने किंवा एका भांड्यात खाल्ल्याने पसरत नाही. हा विषाणू शरीराबाहेर 7 दिवस जिवंत राहतो. कामानिमित्त घराबाहेर राहणार्या लोकांना याचा धोका जास्त असतो. पुरुषांमध्ये हिपॅटायटीसचा धोका वाढू नये म्हणून आपले वय 40 पेक्षा जास्त असेल तर नक्कीच हिपॅटायटीसची लस घ्या. हे वाचा - भरपूर पाणी पिणं फायदेशीर असलं तरी हे शारीरिक त्रास त्यामुळेच होऊ शकतात एचपीव्ही लस - HPV लसीचे तीन डोस आहेत, त्यापैकी तुम्हाला पहिला डोस 21 वर्षाखालील मिळायला हवा. दुसरा डोस दोन महिन्यांनी आणि तिसरा डोस पहिल्या डोसनंतर सहा महिन्यांनी दिला जातो. अनेक पुरुषांमध्ये एचपीव्हीची लक्षणे दिसत नाहीत, ही लक्षणे ओळखणे कठीण होते. याशिवाय आपल्याला एचपीव्हीमुळे कर्करोग होण्याची भीती असते, त्यामुळे प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, ज्या पुरुषांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे किंवा ते इतर आजारांना सारखे बळी पडतात, त्यांना एचपीव्ही संसर्ग होण्याचा धोका असतो. हे वाचा - 40 नंतर महिला अशा जाडजुड का बरं होतात? एक्सपर्टसने सांगितले कारण आणि उपाय हिपॅटायटीस ए लस - हिपॅटायटीस हा एक गंभीर आजार आहे. ज्यामुळे यकृताशी संबंधित समस्या उद्भवतात. हिपॅटायटीस ए दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरू शकतो. हेपेटायटीस ए लसीचे दोन डोस आहेत आणि त्यामध्ये सहा महिन्यांचे अंतर आहे. आपल्या जोडीदाराला हिपॅटायटीस ए हा आजार असेल तर तुम्ही त्याच्याशी संबंध ठेवणे टाळावे. (याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करावी.) याशिवाय हिपॅटायटीस ए टाळण्यासाठी दूषित पाणी आणि अन्न खाणे टाळावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.