जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Antibiotics Side Effect : सर्रासपणे घेतल्या जाणाऱ्या 'या' औषधांमुळे बहिरे होण्याचा धोका; तज्ज्ञांनी केलं सावध

Antibiotics Side Effect : सर्रासपणे घेतल्या जाणाऱ्या 'या' औषधांमुळे बहिरे होण्याचा धोका; तज्ज्ञांनी केलं सावध

Antibiotics Side Effect : सर्रासपणे घेतल्या जाणाऱ्या 'या' औषधांमुळे बहिरे होण्याचा धोका; तज्ज्ञांनी केलं सावध

आपल्या सर्वांना कधी ना कधी अँटिबायोटिक्सचा वापर करावा लागतो. जेव्हा कोणत्याही प्रकारचा संसर्ग होतो तेव्हा डॉक्टर अँटिबायोटिक्स लिहून देतात. परंतु काही लोकांमध्ये, अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिकच्या दुष्परिणामांमुळे कानाचे आजार होतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी संसर्गाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रतिजैविक म्हणजे अँटिबायोटिक्स घेणे, आपल्यासाठी अत्यावश्यक बनते. परंतु अँटिबायोटिक्सचा अतिवापर आपल्या सर्वांसाठी हानिकारक आहे. अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे काही लोकांच्या कानाच्या पेशी मरतात, त्यामुळे बहिरेपणाचाही सामना करावा लागू शकतो. वास्तविक बहिरेपणा अँटिबायोटिक्स अमिनोग्लायकोसाइडमुळे होतो. यामुळे ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होऊ शकते. अमिनोग्लायकोसाइड्समुळे कानाच्या पेशी का मरतात हे आतापर्यंत माहीत नव्हते. आता शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे. इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारे असा दावा केला आहे की, अँटिबायोटिक्सच्या प्रभावामुळे कानात ऐकण्यासाठी जबाबदार असलेल्या पेशींमध्ये ऑटोफॅजी मेकॅनिझम होते, ज्यामुळे ऐकण्याच्या पेशी पूर्णपणे आणि अखेरीस कायमच्या मरतात. त्यामुळे माणसाची ऐकण्याची क्षमता कमी होते.

एक्सपायरी डेटनंतरही कोणती औषधं चालू शकतात? काही तत्काळ फेकून द्यायची

ऐकण्याची क्षमता गमावलेल्या लोकांवर केले जाऊ शकतात उपचार HTK च्या बातमीनुसार, हा अभ्यास जर्नल डेव्हलपमेंट सेलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी अमिनोग्लायकोसाइड्समुळे होणारी ऑटोफॅजी यंत्रणा कशी शोधली याचे वर्णन केले. Aminoglycosides हे अँटिबायोटिक्स कुटुंबातील एक औषध आहे. संशोधकांनी यासाठी प्रयोगशाळेचे मॉडेल विकसित केले आहे. या मॉडेलवरील प्रयोगादरम्यान अमिनोग्लायकोसाइड्सच्या प्रभावामुळे होणारा बहिरेपणा रोखण्यात आला.

News18लोकमत
News18लोकमत

प्रमुख संशोधक नोबल सर्जन प्रोफेसर बो झोऊ म्हणाले की, या शोधानंतर अमिनोग्लायकोसाइडमुळे श्रवणशक्ती गमावलेल्या हजारो लोकांवर उपचार करणे शक्य होणार आहे. त्यांनी सांगितले की श्रवणशक्ती कमी होण्याचे मुख्य कारण ऑटोटॉक्सिसिटी आहे जे औषधांमुळे होते. ऐकण्याच्या हानीसाठी जबाबदार प्रोटीन सुमारे एक शतकापासून, गंभीर संक्रमणांवर अमिनोग्लायकोसाइड अँटिबायोटिक्सने उपचार केले जात आहेत, असे संशोधकांनी सांगितले. हे औषध स्वस्त आहे, त्यामुळे विकसनशील देशांमध्ये ते खूप वापरले जाते. परंतु सुमारे 20 ते 40 टक्के रुग्णांमध्ये या औषधामुळे कानातील श्रवण पेशी मरतात. यामुळे, कधीकधी ऐकण्याची क्षमता पूर्णपणे गमावली जाते. संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले की ऑटोफॅजी यंत्रणा यासाठी जबाबदार आहे.

चुकून एक्सपायरी डेट संपलेली औषधे खाल्ली तर काय होऊ शकतं? तुमच्याही मनात आहे गैरसमज?

वास्तविक, या यंत्रणेमध्ये अमिनोग्लायकोसाइड RIPOR2 नावाच्या प्रोटीनशी जोडले जाते. हे प्रोटीन ऐकण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. संशोधकांनी यासाठी उंदरांची दोन मॉडेल्स बनवली आणि ती नेहमीच्या पद्धतीने विकसित केली. यानंतर त्यातील RIPOR2 नावाचे प्रोटीन झपाट्याने कमी झाले. आता त्यात संसर्ग झाला तेव्हा अमिनोग्लायकोसाइडचा डोस दिला. यानंतर असे दिसून आले की उंदरांच्या कानाच्या पेशींना इजा झाली नाही किंवा श्रवणशक्तीही गेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात