मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

एक्सपायरी डेटनंतरही कोणती औषधं चालू शकतात? काही तत्काळ फेकून द्यायची

एक्सपायरी डेटनंतरही कोणती औषधं चालू शकतात? काही तत्काळ फेकून द्यायची

 कोडिन आधारित कफ सायरप्सवर बंदी येऊ शकते. त्यात टॉसेक्स, अ‍ॅस्कोरिल आणि फॅन्सीडील टी अशा औषधांचा समावेश आहे.

कोडिन आधारित कफ सायरप्सवर बंदी येऊ शकते. त्यात टॉसेक्स, अ‍ॅस्कोरिल आणि फॅन्सीडील टी अशा औषधांचा समावेश आहे.

अनेकदा इंटरनेटवर माहिती वाचून अनेक जण स्वतःला डॉक्टर समजायला लागतात आणि आजाराशी संबंधितनिर्णय देखील स्वतःच घेऊ लागतात; पण कोणत्याही औषधाबद्दल शंका असेल तर ते फेकून देणं अधिक चांगलं ठरतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 सप्टेंबर : एक्सपायरी डेट (Expiry Date) ही अशी तारीख असते, की ज्यानंतर संबंधित औषध (Medicine) परिणामकारक ठरत नाही. 'एक्सपायरी डेट हे फक्त मिथक आहे आणि आम्ही दोन-तीन वर्षं जुनी औषधंदेखील घेतो,' असं काही जण म्हणतात. वास्तविक, कोणत्याही औषधाची एक्सपायरी डेट म्हणजे काय आणि ते मुदत संपल्यानंतर वापरणं योग्य असतं की अयोग्य या गोष्टी आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतात. यासाठी सर्वप्रथम औषध कालबाह्य होणं म्हणजेच एक्सपायरीचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. तुम्ही कोणतंही औषध किंवा आरोग्याशी (Health) निगडित कोणताही पदार्थ खरेदी करता, तेव्हा त्यावर तुम्हाला दोन तारखा स्पष्ट दिसतात. यात पहिली असते ती उत्पादन निर्मितीची तारीख (Manufacturing Date) म्हणजेच औषध किंवा उत्पादन ज्या दिवशी तयार झालं त्याची तारीख. तसंच एक्सपायरी डेट म्हणजे अशी तारीख, की ज्यानंतर औषधाच्या परिणामाची हमी उत्पादक कंपनी घेत नाही.

औषधांमध्ये काही रसायनं (Chemical) असतात. काळानुसार प्रभाव बदलत जाणं, हे सर्व रासायनिक पदार्थांचं वैशिष्ट्य असतं. औषधांच्या बाबतीतदेखील असंच होतं. हवा, ओलावा आणि उष्णता आदी गोष्टींमुळे अनेकदा औषधांची परिणामकारकता कालांतरानं हळूहळू कमी होत जाते. यामुळे औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच सर्व औषध कंपन्या कायदेशीर त्रास टाळण्यासाठी आपापल्या उत्पादनांवर त्याची उपयुक्तता दर्शवणारी एक निश्चित तारीख नमूद करत असतात.

वाचा - Explainer : क्या एक्सपायरी दवाओं का इस्तेमाल है खतरनाक या होती हैं बेअसर

एएमए (AMA) या अमेरिकी वैद्यकीय संस्थेने 2001 मध्ये एक तपासणी केली. त्यांनी 122 वेगवेगळ्या औषधांच्या 3000 बॅचेस घेतल्या आणि त्यातलं सातत्य तपासलं. या सातत्याच्या आधारावर, एएमएने 88 टक्के औषधांची एक्सपायरी डेट सुमारे 66 महिन्यांनी वाढवली. याचा अर्थ बहुतेकशा औषधांची कार्यक्षमता त्यांच्यावर छापलेल्या एक्सपायरी डेटपेक्षा जास्त असते. एएमएने ज्या औषधांची एक्सपायरी डेट वाढवली त्यात अ‍ॅमॉक्सिसिलिन, सिप्रोफ्लोक्सॅसिन आणि मॉर्फिन सल्फेटचा समावेश होता. तथापि, ज्या 18 टक्के औषधांची मुदत संपली होती, ती औषधं फेकून देण्यात आली.

एक्सपायरी डेट संपल्यावरही ती औषधं घेता येतात का, असा प्रश्न अनेक जण विचारतात; मात्र याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु, एखादं औषध गोळ्या (Tablets) किंवा कॅप्सूल (Capsules) स्वरूपात असेल तर त्याचा परिणाम त्याच्या एक्सपायरी डेटनंतरही काही दिवस टिकतो; मात्र सिरप, डोळ्यांत किंवा कानांत घालायचे ड्रॉप्स (Eye And Ear Drops) आणि इंजेक्शनची एक्सपायरी डेट संपली असल्यास त्याचा वापर करू नये.

कोणती औषधं कालबाह्य होताच विषारी बनतात, असाही प्रश्न काही जण विचारतात. वैद्यकीय संघटनेने काही औषधं सुचवलेली आहेत, ज्यांचा वापर एक्सपायरी डेटनंतर अजिबात करू नये. डायबेटीसच्या रुग्णांसाठी महत्त्वाची असलेली औषधं एक्सपायरी डेटनंतर खराब होऊ लागतात. हृदयविकार असलेल्या रुग्णांना छातीत दुखत असल्यास जी औषधं दिली जातात ती एक्सपायरी डेटनंतर वापरू नयेत. ही औषधं एकदा उघडल्यानंतर त्यांचा प्रभाव फार लवकर संपतो. रक्त, लस यांचाही वापर निर्धारित कालावधीनंतर करू नये. डोळ्यांसाठी असणारे ड्रॉप्स किंवा अन्य कोणत्याही औषधांच्या बाटलीत कापसासारखा पदार्थ दिसल्यास ती औषधं तातडीनं फेकून द्यावीत.

अनेकदा इंटरनेटवर माहिती वाचून अनेक जण स्वतःला डॉक्टर समजायला लागतात आणि आजाराशी संबंधितनिर्णय देखील स्वतःच घेऊ लागतात; पण कोणत्याही औषधाबद्दल शंका असेल तर ते फेकून देणं अधिक चांगलं ठरतं. यामुळे पैसे वाया जातील, पण आरोग्याची हानी होणार नाही.

First published:

Tags: Health, Medicine