मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जर अशी लक्षणं दिसत नसतील तर नॉर्मल नाहीये तुमची मासिक पाळी!

जर अशी लक्षणं दिसत नसतील तर नॉर्मल नाहीये तुमची मासिक पाळी!

महिलांच्या मासिक पाळीबद्दल (Menstrual Cycle) अजूनही बरेच गैरसमज आहेत. अगदी उच्चशिक्षित महिला किंवा शहरांमध्येही याबाबत अगदी उघडपणे फारशी चर्चा होताना दिसत नाही.

महिलांच्या मासिक पाळीबद्दल (Menstrual Cycle) अजूनही बरेच गैरसमज आहेत. अगदी उच्चशिक्षित महिला किंवा शहरांमध्येही याबाबत अगदी उघडपणे फारशी चर्चा होताना दिसत नाही.

महिलांच्या मासिक पाळीबद्दल (Menstrual Cycle) अजूनही बरेच गैरसमज आहेत. अगदी उच्चशिक्षित महिला किंवा शहरांमध्येही याबाबत अगदी उघडपणे फारशी चर्चा होताना दिसत नाही.

    नवी दिल्ली, 28 मे : महिलांच्या मासिक पाळीबद्दल (Menstrual Cycle) अजूनही बरेच गैरसमज आहेत. अगदी उच्चशिक्षित महिला किंवा शहरांमध्येही याबाबत अगदी उघडपणे फारशी चर्चा होताना दिसत नाही. मासिक पाळीबद्दल समस्या असेल, तर तीही अनेकदा लपविली जाते. काही वेळा महिलांना त्रास होत असतो किंवा काही लक्षणं जाणवत असतात, त्याचा मासिक पाळीवर (Periods) परिणाम होत असतो. याबद्दल माहिती देणारं वृत्त ‘हरजिंदगी डॉट कॉम’ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

    आजच्या पिढीतल्या तरुण महिलांची आजी किंवा अगदी आई, काकू, मावशी यांनाही कदाचित या समस्या जाणवल्या असतील, पण त्याही उघडपणे याबद्दल बोलू शकल्या नसतील. अनेकजणी आजही या समस्येबद्दल मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. त्याचा त्यांच्या आरोग्यवर परिणामही होतो. पीरियड्सबाबतची नेमकी काय समस्या आहे (Complaints About Periods) आणि तो त्रास का होत आहे किंवा आपल्याला डॉक्टर्सना नेमकं काय सांगायचं आहे याबद्दलही त्यांचा गोंधळ उडतो.

    M.B.BS, MD (Obgyn) असलेल्या डॉक्टर अमीना खालिद यांनी याबाबत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माहिती शेअर केल्याचं या वेबसाइटच्या वृत्तात म्हटलं आहे. मासिक पाळीच्या वेळेस किंवा त्यासंदर्भात खालीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवत असतील, तर याचा अर्थ तुमची मासिक पाळी नियमित नाही. त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, असं त्या म्हणतात.

    1. जर 21-35 दिवसांत मासिक पाळी येत नसेल तर मासिक पाळी नियमित नाही

    सहसा मासिक पाळीचं चक्र 21 ते 35 दिवसांचं (Menstrual Cycle is for 21-35 Days) असतं. तुमचे पीरियड्स या चक्रानुसार येत असतील, तर याचा अर्थ ते नॉर्मल आहेत; पण या चक्रापेक्षा जास्त किंवा कमी दिवसांत जर पीरियड्स येत असतील तर याचा अर्थ ते नॉर्मल नाहीत. अगदी कमी दिवसांतच मासिक पाळी येत असेल, तर युटेरस म्हणजे गर्भाशयाशी (uterus) संबंधित काही समस्या असू शकते. पीरियड्स उशिरा येत असतील, तर ते एखाद्या गंभीर आजाराचंही लक्षण असू शकतं. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अनेकदा आरोग्याशी संबंधित अन्य तक्रारींमुळेही असं होऊ शकतं; पण असं वारंवार होत असेल तर त्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे.

    2. मासिक पाळीत असह्य वेदना

    मासिक पाळीत अनेक स्त्रियांना पोटदुखी (Stomach Pain), कंबरदुखी, हातपाय दुखण्याचा त्रास होतो. वेदना असह्य होत असतील आणि तुम्ही तुमची नियमित कामंही पूर्ण करू शकत नसाल, तर मात्र हे नॉर्मल नाही. थोडेसे क्रॅम्प्स (Cramps) येणं स्वाभाविक असतं; पण क्रॅम्प्सचा खूप जास्त त्रास होत असेल आणि त्यामुळे तुम्हाला काहीही सुचत नसेल किंवा औषध घेतल्याशिवाय कामच करता येत नसेल तर ते नॉर्मल नाही आणि याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे.

    3. 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस रक्तस्राव (Bleeding)

    साधारणपणे पीरियड्समध्ये प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ब्लीडिंग कमी-जास्त होत असतं. काही जणींना ब्लीडिंग कमी होतं, तर काही जणींना खूप जास्त; पण 2 दिवसांपेक्षा कमी आणि 7 दिवसांपेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल तर ते नक्कीच सर्वसाधारण नाही. मासिक पाळीशी संबंधित ती एक समस्या असू शकते. तुम्हाला पीरियड्समध्ये 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त रक्तस्राव (Bleeding More Than 10 Days) होत असेल, तर हे एखाद्या आजाराचंही लक्षण असू शकतं. त्यामुळे डॉक्टरांकडे अवश्य जा.

    4. स्पॉटिंगचा त्रास (Spotting)

    दोन पीरियड्सच्या दरम्यानच्या काळात एखाद्या वेळेस स्पॉटिंग (Spotting) होणं हे नॉर्मल आहे; पण दोन पीरियड्सच्या काळात वारंवार स्पॉटिंग होत असेल, तर याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे पीरियडफ्री होऊ शकत नाही. एखादी इजा किंवा एखाद्या औषधामुळे असं स्पॉटिंग होत आहे का हे जाणून घ्या; पण कायमच हा त्रास होत असेल तर त्यावर तातडीनं उपचार करा.

    वरीलपैकी कोणतीही लक्षणं किंवा त्रास जाणवत असेल, तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मासिक पाळी वेळेवर येणं आणि त्यात फारसा त्रास न होणं हे स्त्रीच्या चांगल्या आरोग्याचं लक्षणं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे मासिक पाळीशी संबंधित कोणताही त्रास जाणवला तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

    First published:

    Tags: Health, Periods, Women safety