Home /News /lifestyle /

रक्तातील वाढलेलं Uric Acid लगेच कमी होईल; चमत्कारिक आहेत ही साधी वाटणारी 3 पाने

रक्तातील वाढलेलं Uric Acid लगेच कमी होईल; चमत्कारिक आहेत ही साधी वाटणारी 3 पाने

शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण (High Level Of Uric Acid Is Harmful) वाढल्याने सांधेदुखी, शरीरातील काही भागात सूज येणे आणि कंबर किंवा मनगटामध्ये वेदना होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.

    मुंबई, 28 मे : हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला आपल्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकवेळा आरोग्य संबंधित समस्या डोकं वर काढतात. याचप्रमाणे शरीरात जर युरिक अ‍ॅसिडचे (Increasing Level Of Uric Acid Is Harmful) प्रमाण वाढले तर तेदेखील आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.  मात्र काही घरगुती उपाय वापरूनदेखील शरीरातील युरिक अ‍ॅसिड कंट्रोल किंवा शरीरातून बाहेर काढता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत. युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) हे रक्तात असणारे एक रसायन आहे. प्युरीक अ‍ॅसिडपासून (Puric Acid) बनलेल्या खाद्यपदार्थांपासून युरिक अ‍ॅसिडची निर्मिती होते. प्युरीक अ‍ॅसिडयुक्त पदार्थ पचन प्रक्रियेत युरिक अ‍ॅसिडची निर्मिती करतात. शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखी, शरीरातील काही भागात सूज येणे आणि कंबर किंवा मनगटामध्ये वेदना होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते. हेही वाचा... Fasted Cardio: रिकाम्या पोटी केला जाणारा हा व्यायाम प्रकार कधी आणि कोणी करावा शरीरातील वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडची समस्या दूर करण्यासाठी घरातील काही पदार्थ खूप उपयुक्त ठरतात. प्रत्येकाच्या घरात तेजपत्ता किंवा तमालपत्र नक्की असते. हा मसाल्यातील एक प्रकार आहे. तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फॉलीक अ‍ॅसिड असते. हे तमालपत्र शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी मदत करते (Bay leaf To Control Uric Acid). यासाठी 10 ते 20 तमालपत्र म्हणजेच पाने घ्या. ते थोडावेळ पाण्यात ठेऊन नंतर हे पाणी गरम करा. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यावर ते प्यावे. तुम्ही असे दिवसातून दोनवेळा करू शकता किंवा एकदाच पाणी तयार करून ते दोनवेळा प्यावे. हेही वाचा... 1 रुपयात 10 Sanitary pads; ठाकरे सरकारकडून Menstrual Hygiene day निमित्त महिलांना मोठं गिफ्ट तमालपत्राप्रमाणेच नाही एक गुणकारी पालेभाजी आहे, जी शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास उपयुक्त आहे आणि ती म्हणजे कोथिंबीर (Cilantro To Control Uric Acid). कोथिंबिरीमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि लोह असते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन केदेखील मोठ्या प्रमाणात असते. शरीरातील युरिक अ‍ॅसिड काढण्यासाठी तुम्हाला कोथिंबिरीची एक जुडी घ्यायची आहे. ती व्यवस्थित धुवून मिठाच्या पाण्यामध्ये ठेऊन द्यावी. त्यानंतर हे पाणी उकळून घ्यावे आणि थंड करण्यासाठी ठेवावे. पाणी हलके कोमट झाल्यावर ते प्यावे. नियमित हा उपाय केल्यास तुम्हाला काही दिवसात नक्की फरक जाणवेल. त्याचबरोबर खायचे पान (Pan), जे आपण अनेकदा जेवणानंतर खातो. ते पानदेखील तुम्ही नियमितपणे चावून खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या शरीरातील युरिक अ‍ॅसिडची समस्या खूप प्रमाणावर कमी होऊ शकते.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या