Home /News /lifestyle /

मुलांना शाळेत पाठवू की नको? पालक म्हणून तुमचा होतोय गोंधळ; आधी डॉक्टर काय म्हणाले पाहा

मुलांना शाळेत पाठवू की नको? पालक म्हणून तुमचा होतोय गोंधळ; आधी डॉक्टर काय म्हणाले पाहा

24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. पण कोरोनाच्या संकटात मुलांना शाळेत पाठवायचं की नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही आणि तिसऱ्या लाटेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट लहान मुलांना लक्ष्य करत आहे. गेल्या 19 दिवसात 1 ते 10 वर्ष वयोगटातल्या 17, 533 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीतही राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे (Maharashtra school reopen). त्यामुळे मुलांना  शाळेत पाठवायचं का याबाबत पालकांच्या मनात चलबिचल आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.  अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (Maharashtra School reopen from 24th January said Minister Varsha Gaikwad). शाळा सुरू करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास संमती देतील असे विद्यार्थी शाळेत येतील, असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आपण नेमकं काय करावं, असा प्रश्न पालकांना पडला आहे. हे वाचा - 'आता शाळा सुरू केल्या तर..', सरकारच्या निर्णयानंतर तज्ज्ञांनी सांगितला मोठा धोका लहान मुलांचं लसीकरण सुरू होताच सरकारने जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करणं धोक्याचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र आयएमएचे (Maharshtra IMA) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे  म्हणाले, "महाराष्ट्रात आता पुन्हा शाळा सुरू होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. जोपर्यंत मुलांचं पूर्ण लसीकरण होत नाही, तोपर्यंत त्यांना शाळेत पाठवणं योग्य नाही. कारण मुलांनाही कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यांना गंभीर इन्फेक्शन होऊ शकतो. अशी मुलं घरात गेल्यानंतर घरातील वयस्कर आणि इतर व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह करू शकतात. घरातील इतर सदस्यांपर्यंत कोरोना पोहोचवू शकतात. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण करावं, मगच शाळा सुरू करण्याच्या सूचना सरकारने द्याव्यात" हे वाचा - कोरोना पॉझिटिव्ह आई लेकीलाही पाजतेय आणि स्वतःही पितेय आपलं Breastmilk कारण... "आता सरकारने शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. जर मुलांना शाळेत पाठवायचंच झालं तर पालकांनी काळजी घ्यायला हवी.  मुलांचं कोरोना लसीकरण करून घ्यावं. 14 वर्षांखालील मुलांना इन्फ्लुएंझाचं इंजेक्शन द्यावं.  शाळेत जाताना मुलांना अतिरिक्त मास्क द्यावेत, सॅनिटायझर द्यावं. मुलांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, हात कसे स्वच्छ धुवावेत याबाबत योग्य माहिती द्यावी. शाळेतून घरी परतल्यानंतरही शूझ बाहेर ठेवणं, हातपाय स्वच्छ धुऊन, कपडे बदलण्याची सवय लावावी", असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी पालकांना दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, School

    पुढील बातम्या