जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / 'आता शाळा सुरू केल्या तर...', ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर तज्ज्ञांनी सांगितला मोठा धोका

'आता शाळा सुरू केल्या तर...', ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर तज्ज्ञांनी सांगितला मोठा धोका

पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र असं करणं धोक्याचं असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी : येत्या सोमवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा (Maharashtra school reopen) सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (Maharashtra School reopen from 24th January said Minister Varsha Gaikwad). पण आता शाळा सुरू केल्यातर सर्वात मोठा धोका आहे, याबाबत तज्ज्ञांनी सरकारला सावध केलं आहे. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही आणि तिसऱ्या लाटेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट लहान मुलांना लक्ष्य करत आहे. गेल्या 19 दिवसात 1 ते 10 वर्ष वयोगटातल्या 17, 533 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा उघडायचा निर्णय़ झाला असला, तरी शाळेत मुलांना पाठवायचं का याबाबत पालकांच्या मनात चलबिचल आहे. खरंतर तज्ज्ञांनी लहान मुलांचं पूर्ण लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरूच करू नयेत, असा सल्ला दिला आहे. महाराष्ट्र आयएमएचे (Maharshtra IMA) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे  म्हणाले, “महाराष्ट्रात आता पुन्हा शाळा सुरू होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. जोपर्यंत मुलांचं पूर्ण लसीकरण होत नाही, तोपर्यंत त्यांना शाळेत पाठवणं योग्य नाही. कारण मुलांनाही कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यांना गंभीर इन्फेक्शन होऊ शकतो. अशी मुलं घरात गेल्यानंतर घरातील वयस्कर आणि इतर व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह करू शकतात. घरातील इतर सदस्यांपर्यंत कोरोना पोहोचवू शकतात” हे वाचा-   New Covid Treatment Guidelines: कोरोनानंतर सतत खोकला आहे का? असू शकतो टीबी “लहान मुलांसाठी दोन कोरोना लशींना आपात्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाते आहे. पण यापेक्षा कमी वयाच्या मुलांना जर ऑक्टोबरपासून योजना आखली असती तर त्यांचंही लसीकरण झालं असतं. आणि कोणत्याही चिंतेशिवाय शाळा सुरू करता आल्या असता.

जाहिरात

“लसीकरणाशिवाय आपल्या पाल्याला कोरोना झाला तर काय, अशी चिंता पालकांनाही सतावते आहे, त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण करावं, मगच शाळा सुरू करण्याचे आदेश द्यावेत”, असं डॉ. भोंडवे म्हणाले. शाळा सुरू करण्याबाबत सरकारची सूचना काय? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, “राज्यातील शाळा सुरू करण्याची मागणी अनेक पालक, शिक्षकांकडून होत होती. त्यानंतर या संदर्भात राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे” हे वाचा-  Covid-19 Cases in Child: शाळा सुरू होणार; पण मुंबईत पालकांचं संमतीपत्र आवश्यक “स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्या अशी मी विनंती करत आहे.  शाळा सुरू करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास संमती देतील असे विद्यार्थी शाळेत येतील.  शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारयांनी दोन डोस घेतलेले असावेत. तसेच शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत”, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात