लंडन, 18 जानेवारी : कोरोनाव्हायरसची
(Coronavirus) लागण झाल्यानंतर आपल्या मुलांना दूध पाजावं की नाही, असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. असं असताना एक कोरोना पॉझिटिव्ह आई मात्र फक्त आपल्या मुलीला आपलं दूध पाजत नाही तर ती स्वतःही आपलं ब्रेस्टमिल्क पिते आहे. काय तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? ही महिला असं का करते आहे, यामागे एक खास कारण आहे
(Corona positive mother drink her own milk).
अश्मिरी (Ashmiry) असं या महिलेचं नाव आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिने आपला अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे
(Corona positive mother brastmilk turn green). कोरोना झाल्यानंतर त्याचे शरीरावर बरेच परिणाम दिसून येतात. बहुतेकांना कोरोनाचे दुष्परिणामच दिसून आले आहेत. पण या महिलेला मात्र कोरोनाचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
अश्मिरीला दोन मुलांची आई आहे. तिची लहान मुलगी अजूनही ब्रेस्टफिडिंगवर (Breastmilk) आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिनं तिच्यासाठी मिल्क पंप केलं तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या दुधाचा रंग बदलला होता. एरवी क्रिमी पांढऱ्या रंगाचं असणारं दूध हिरव्या रंगाचं झालं होतं. दुधाचा रंग असा अचानक बदलल्याने तीसुद्धा घाबरली.
हे वाचा - सर्दी, व्हायरल तापाची लक्षणं, तरी कोरोना टेस्ट करावी का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा
तिने आपल्या ब्रेस्टमिल्कमधील फरक दाखवणारा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एका पिशवीतील दूध पांढरं आणि एका पिशवीतील दूध हिरवं दिसतं आहे. ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिच्या दुधाचा रंग हिरवा झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, खरंतर कोरोनामुळे ब्रेस्टमिल्कचा बदलेला रंग म्हणजे हे दूध पहिल्यापेक्षा अधिक पौष्टिक आणि इम्युनिटी वाढवणारं झालं.
हे वाचा - काय म्हणावं याला! म्हणे, 'मला हवी कोरोना पॉझिटिव्ह तरुणी', पैसे देण्याचीही तयारी
आपलं हे दूध आपल्या कोरोना पॉझिटिव्ह मुलीला आजाराशी लढण्यासाठी ताकद देईल. तसंच त्याचे इतके फायदे पाहून तिनेसुद्धा आपलं ब्रेस्टमिल्क प्यायल्याचं तिने सांगितलं, असं वृत्त
द सनने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.