मराठी बातम्या /बातम्या /Viral /लय भारी..! भावाला डोक्यावर उलटं उचललं अन् 53 सेकंदात चढला 100 पायऱ्या; बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

लय भारी..! भावाला डोक्यावर उलटं उचललं अन् 53 सेकंदात चढला 100 पायऱ्या; बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

आता व्हिएतनामच्या एका तरुणाचे नावही एका अजब पण साहसी रेकॉर्डसाठी (Vietnam Man world record) नोंदवण्यात आले आहे.

आता व्हिएतनामच्या एका तरुणाचे नावही एका अजब पण साहसी रेकॉर्डसाठी (Vietnam Man world record) नोंदवण्यात आले आहे.

आता व्हिएतनामच्या एका तरुणाचे नावही एका अजब पण साहसी रेकॉर्डसाठी (Vietnam Man world record) नोंदवण्यात आले आहे.

व्हिएतनाम, 28 डिसेंबर:  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विविध प्रकारच्या विश्वविक्रमांचा समावेश आहे. यामध्ये मग काही विक्रम अगदी विचित्र आहेत, तर काही अगदी धाडसी. यात आता व्हिएतनामच्या एका तरुणाचे नावही एका अजब पण साहसी रेकॉर्डसाठी (Vietnam Man world record) नोंदवण्यात आले आहे. या तरुणाने आपल्या भावाला डोक्यावर उलटं उचलून घेत अवघ्या 53 सेकंदांमध्ये तब्बल 100 पायऱ्या चढण्याचं रेकॉर्ड (Vietnam man climb stairs with brother) बनवला आहे. 23 डिसेंबर 21ला स्पेनमधील सेंट मेरी कॅथेड्रल चर्चच्या पायऱ्यांवर हे रेकॉर्ड (Vietnam brothers world record) बनवण्यात आलं. या भावांच्या कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जियांग क्वोक को (37) आणि जियांक क्वोक नीप (32) अशी या दोन भावांची नावं आहेत. हे दोघेही सर्कशीत काम करतात. विशेष म्हणजे अशा प्रकारचं रेकॉर्ड करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी 52 सेकंदांमध्ये 90 पायऱ्या चढून विश्वविक्रम (Vietnam brothers viral video) प्रस्थापित केला होता. तसेच, पुढे 2018 मध्ये या दोन भावांनी अशाच प्रकारे बॅलन्स ठेवत, आणि डोळ्यावर पट्टी बांधून दहा पायऱ्या चढून आणि उतरून दाखवल्या होत्या. एका टीव्ही शोसाठी हा स्टंट करतानाच त्यांनी आणखी एका गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली होती. वन इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पेरूच्या कलाकारांनी मोडलं रेकॉर्ड

दरम्यान, 2018 साली जियांग बंधूंचं स्पेनमधील 2016 चं रेकॉर्ड मोडण्यात आलं होतं. पेरू देशातील पाब्लो नोनाटो आणि जॉईल याईकेट या दोन कलाकारांनी जियांग भावांप्रमाणेच 52 सेकंदात 91 पायऱ्या चढून दाखवल्या. जियांग भावांपेक्षा एक पायरी जास्त चढल्यामुळे पेरूमधील कलाकारांचे नाव गिनीज बुकमध्ये (Peru acrobats world record) नोंदवण्यात आले.

" isDesktop="true" id="649577" >

पुन्हा प्रस्थापित केलं रेकॉर्ड

यानंतर यावर्षी पुन्हा जियांग भावांनी या रेकॉर्डवर (Vietnam Acrobats brothers video) आपलं नाव कोरलं. स्पेन देशातील गिरोनामध्ये असणाऱ्या त्याच सेंट मेरी कॅथेड्रल चर्चच्या पायऱ्यांवर त्यांनी पुन्हा एकदा विश्वविक्रम केला. जुनं रेकॉर्ड मोडण्यासाठी त्यांनी 10 नव्या पायऱ्या बनवून घेतल्या होत्या. “इतर 90 पायऱ्यांपेक्षा या नव्या पायऱ्या वेगळ्या उंचीच्या आणि वेगळ्या धातूच्या बनवलेल्या होत्या. तसेच, या पायऱ्यांवर सराव करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. तरीही आपला आधीचा अनुभव वापरून आम्ही हे रेकॉर्ड पूर्ण केलं.” असं जियांग बंधूंनी सांगितलं.

“कडाक्याची थंडी असल्यामुळे आम्ही तणावात होतो. मात्र, आमच्या तयारीवर आमचा विश्वास होता. यासाठी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून मेहनत घेत आहोत. यादरम्यान कित्येक वेळा अपघात झाले, जखमा झाल्या. मात्र, प्रत्येक वेळी आम्ही अधिक उत्साहाने सराव सुरू ठेवला.” असं या दोघांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Video viral