Home /News /lifestyle /

OMG! 9 महिने नव्हे तर तब्बल 35 वर्षे 'प्रेग्नंट' होती महिला; रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

OMG! 9 महिने नव्हे तर तब्बल 35 वर्षे 'प्रेग्नंट' होती महिला; रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

पोटातील वेदनेने ही महिला त्रस्त होती.

    अल्जेरिया, 27 डिसेंबर : प्रेग्नन्सी (Pregnancy) सामान्यपणे 9 महिन्यांची असते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला तब्बल 35 वर्षे प्रेग्नंट होती. तिचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. तिच्या पोटात 7 महिन्यांचं भ्रूण होतं. ज्यााल डॉक्टरांनी स्टोन बेबी (Stone Baby) म्हटलं आहे. तिच्या गर्भात (Womb) स्टोन बेबी सापडला आहे. अल्जेरियातील हे धक्कादायक प्रकरण आहे. 73 वर्षांची ही महिला. पोटदुखीने त्रस्त होती. तिच्या पोटात अधूनमधून वेदना व्हायच्या. यावेळी तीव्र वेदना सुरू झाल्या म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिच्या काही तपासण्या केल्या. तिचा रिपोर्ट पाहून त्यांनाही धक्का बसला. तिच्या गर्भात एक सात महिन्यांचा भ्रूण होता पण त्याचं स्टोन झालं होतं. द सनच्या रिपोर्टनुसार याआधी महिलेवर उपचार झाले पण डॉक्टरांना याची माहितीच झाली नाही. सात वर्षांपासून हा भ्रूण तिच्या पोटात होता पण तिला त्यामुळे गंभीर दुष्परिणाम झाला नाही. कधी कधी तिच्या पोटात सौम्य वेदना व्हायच्या. या स्टोन बेबीचं वजन तब्बल 4.5 पाऊंड होतं. हे वाचा - सोळाव्या वर्षी केलं आयुष्यातील पहिलं जेवण, आतापर्यंत जगत होती फक्त दोन गोष्टींवर डॉक्टरांनी सांगितलं हे एक लिथोपेडियन (Lithopedion) आहे. जेव्हा प्रेग्नन्सी गर्भाशयाऐवजी पोटात होते, प्रेग्नन्सीमध्ये रक्तपुरवठा नीट होत नाही तेव्हा भ्रूण विकसित होत नाही. ज्यामुळे शरीरातून भ्रूण बाहेर काढण्याचा कोणताच मार्ग नसतो. त्यानंतर शरीर रोगप्रतिकारक प्रणालीचा उपयोग करून भ्रूणला स्टोनमध्ये बदलतो. त्यामुळे या महिलेच्या पोटात सापडलेल्या भ्रूणाला स्टोन बेबी असं म्हटलं आहे. जर्नल ऑफ दर रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनमधील (Journal of the Royal Society of medicine)  1996 च्या एका लेटरनुसार लिथोपेडियनचे आतापर्यंत फक्त 290 प्रकरणांबाबत माहिती मिळाली आहे. हे वाचा - चष्म्याने उलगडा सर्वात मोठा 'राज', गर्लफ्रेंडसमोर चीटर बॉयफ्रेंडची पोलखोल क्लीव्हलँडच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल केस मेडिकल सेंटरचे डॉक्टर किम गार्सी Dr. Kim Garcsi) यांनी सांगितलं, टिश्यू कॅल्सिफिकेशन (Tissue Calcification) आईला इतर संसर्गापासून वाचवतं आणि हा स्टोन किती तरी दशकांपर्यंत पोटात राहू शकतो. बहुतेक वेळ लोक हे शोधतात आणि सापडताच हे काढून टाकत नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Pregnancy, Pregnant woman, Viral

    पुढील बातम्या