Home /News /viral /

अपघातानंतर Bachpan Ka Pyaar फेम Sahdev Dirdo चा पहिला VIDEO; हात जोडून म्हणाला...

अपघातानंतर Bachpan Ka Pyaar फेम Sahdev Dirdo चा पहिला VIDEO; हात जोडून म्हणाला...

Bachpan ka pyar fame sahdev dirdo : अपघातानंतर 15 दिवसांनंतर बचपन का प्यार फेम सहदेव दिरदो सोशल मीडियावर परतला आहे. त्याने आपला पहिला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  सुकमा, 13 जानेवारी :  बचपन का प्यार (Bachpan ka pyar) गाण्यामुळे रातोरात स्टार झालेल्या छत्तीसगडच्या (chhattisgarh)  सहदेव दिरदोचा अपघात (Sahdev dirdo accident) झाला होता. अपघातात तो गंभीर झाला होता (Bachpan ka pyar fame sahdev dirdo accident). अपघातानंतर जवळपास 15 दिवसांनंतर तो सोशल मीडियावर परतला आहे. अपघातानंतर त्याने आपला पहिला व्हिडीओ पोस्ट केला आहे. 28 डिसेंबर 2021 ला सुकमामध्ये सहदवेचा बाईक अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या अपघाताची बातमी मिळताच सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. आता सहदेव पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने आपला एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने आपण बिलकुल ठिक असल्याची माहिती दिली आहे. तसंच डॉक्टर्स आणि त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या नेटिझन्सचे त्याने आभार मानले आहेत.
  व्हिडीओत सहदेव हात जोडून दिसतो. तो म्हणतो, "नमस्कार मी सहदेव, मी आता पूर्णपणे ठीक झालो आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेसाठी तुमचे धन्यवाद मानतो. डॉक्टर आणि स्टाफचाही खूप आभारी आहे" कसा झाला होता सहदेवचा अपघात? सहदेव आपल्या मित्रांसोबत एका बाईकवरून ट्रिपल सीट प्रवास करत होता. एके ठिकाणी रस्त्यावरील वाळू आणि खडकावरून त्यांची बाईक घसरली. त्यामुळे त्यांचा हा अपघात झाला आहे.  डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी एका स्थानिक रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्याला एका सुसज्ज रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक तास होऊनही तो बेशुद्ध अवस्थेतच होता. हे वाचा - GF च्या लग्नात BF ची एंट्री! नवरदेवासमोरच प्रपोज केलं; पुढे काय घडलं पाहा VIDEO गेल्या वर्षी जुलैमध्ये सहदेवचा बचपन का प्यार गाण्याचा व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. ज्यामध्ये तो शाळेच्या गणवेशात दिसतो. त्याच्या गाण्याच्या हटके अंदाजामुळे तो रातोरात फेमस झाला. सोशल मीडियावर अगदी मोठमोठ्या सेलिब्रेटीने या गाण्यावर रील बनवला होता. या गाण्यामुळे या चिमुकल्याचं नशीब पालटलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गाण्याची भुरळ प्रसिद्ध गायक-रॅपर बादशाहालासुद्धा पडली होती. त्यामुळेच त्याने सहदेवसोबत यावर एक सुंदर रॅप तयार केला होता. हे वाचा - VIDEO : डान्स करताना केलेली एक चूक भोवली; मंडपातच धाडकन कोसळले नवरी-नवरदेव छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही सहदेवचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. तसंच सहदेवच्या अपघातानंतर त्यांनी  पुढाकार घेत त्याला चांगल्या रुग्णालयात उपचार देण्याचे आणि सर्वोत्तम डॉक्टरांची टीम पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Entertainment, Viral, Viral videos

  पुढील बातम्या