मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय म्हणावं हिला! सुंदर दिसण्याच्या नादात उधळले तब्बल 10 लाख; तरुणीने चेहऱ्याची अक्षरश: लावली वाट

काय म्हणावं हिला! सुंदर दिसण्याच्या नादात उधळले तब्बल 10 लाख; तरुणीने चेहऱ्याची अक्षरश: लावली वाट

सुंदर दिसण्याचा मोह तरुणीला पडला महागात.

सुंदर दिसण्याचा मोह तरुणीला पडला महागात.

सुंदर दिसण्याचा मोह तरुणीला पडला महागात.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 10 डिसेंबर : आपण सुंदर (Natural Beauty) दिसावं असं कुणाला वाटत नाही. तरुणी तर सौंदर्याच्या (Experiments on Beauty)  बाबतीच खूपच विचार करतात. आता सुंदर दिसण्यासाठी फक्त मेकअप नाही तर प्लॅस्टिक, कॉस्मेटिक सर्जरी आणि प्रक्रियाही उपलब्ध आहेत. काही जणांना सुंदर दिसण्याचं इतकं वेड असतं की अगदी या पर्यायांचाही मार्ग ते निवडतात (Popular Beauty Treatments). अशी कॉस्मेटिक प्रक्रिया करणं एका मॉडेलला चांगलंच महागात पडलं आहे (Woman spent 10 lakh on fillers).

तब्बल 10 लाख रुपये उधळून अमेरिकेतील एका मॉडेलने आपली कॉस्मेटिक प्रक्रिया करून गेली. यानंतर सुरुवातीला आपला चेहरा पाहून ती आनंदी झाली. पण आता मात्र तिच्या चेहऱ्याची अवस्था इतकी भयंकर झाली की तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सुंदर दिसण्यासाठी इतके पैसे खर्च केल्यानंतर तिला आता इतका पश्चाताप झाला आहे की तिला तिचा जुना चेहरा परत हवा आहे.

हे वाचा - VIDEO - जोशाजोशात दीराचा वहिनीसमोरच ढासळला तोल; लग्नात ते दृश्य पाहून सर्वच शॉक

न्यूॉर्कमध्ये राहणारी 21 वर्षांची मॉडेल कँडिस क्लॉस (Candice Kloss). कँडिसचा IQ 137 आहे आणि बुद्धिवान लोकांचा क्लब मानल्या जाणाऱ्या मेन्साची सदस्यही आहे. तरी सुंदर दिसण्याचं भूत तिच्या डोक्यावर बसलं होतं. आपण बाहुलीसारखं दिसावं असं तिला वाटत होतं. यासाठी तिने गेल्या दोन वर्षांत आपल्या चेहऱ्यावर किती तरी प्रयोग केले.

तिने चेहरा सुंदर बनवण्यासाठी अनेक कॉस्मेटिक प्रक्रिया केल्या. चेहऱ्यावर फिलर्स करून घेतले. यासाठी तिने तब्बल 10 रुपये खर्च केले.  तिला एक वेगळा आणि फेक लूक तिला हवा होता. काही दिवस तिला आपला नवा लूक आवडला. तिच्या फॉलोअर्सनाही तिचे फोटो खूप आवडतात. पण आता तिला आपण घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होतो आहे.

हे वाचा - जग दिखाव्यावर चालतं, तरुणीनं केलं सिद्ध; पैसे खर्च न करता ‘जगून दाखवलं’!

2021 सालातच तिने ओठ, गाल आणि जॉ लाइनवर फिलर्स केलं होतं. या फिलर्समुळे तिचं नैसर्गिक सौंदर्यही आता नष्ट होत आहे.  आपल्या चेहऱ्याला जशी हानी पोहोचली आहे त्यामुळे आपण लवकरच वयस्कर दिसू लागू याची कल्पना तिला आता आली आहे. कँडिस म्हणते, आता तिला पुन्हा सामान्य व्हायचं आहे. आता आपल्या फिलर्सला डिसॉल्व्ह करून जुन्या लूकवर येण्याचा ती प्रयत्न करत आहे.

First published:

Tags: America, Lifestyle, Viral, Viral news, World news