मुंबई, 10 डिसेंबर : लग्नात (Wedding video) काही तरी वेगळं करण्याचा नवरा-नवरीला (Bride groom video) सरप्राइझ देण्याचा प्रयत्न नातेवाईक आणि त्यांचे मित्रमैत्रिणी करत असतात. असंच सरप्राईझ देण्याचा प्रयत्न नवरदेवाच्या मित्रांनी केला. वहिनीसमोर स्टाईल मारण्याच्या नादात दिराचा तोल ढासळला (Devar bhabhi video) आणि नको तेच घडलं. लग्नातच असं काही घडलं की सर्वांनाच धक्का बसला (Wedding dance video).
आपल्या मित्राच्या बायकोला म्हणजे वहिनीला इम्प्रेस करण्यासाठी तरुणांनी एक ग्रुप डान्स ठेवला. वहिनीसमोर काहीतरी स्पेशल करण्यासाठी त्यांची धडपड होती. त्याचवेळी एक तरुणाचा तोल ढासळला आणि पुढे जे घडलं ते पाहून सर्वजण शॉक झाले.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एका खुर्चीत बसले आहे. समोर स्टेजवर काही तरुण आहेत. ते ग्रुप डान्स करत आहेत. त्यावेळी एक तरुण जमिनीवर गुडघे टेकून बसतो आणि दुसरा तरुण त्याच्या पाठीवर चढून स्टंट करायला जातो. त्याचवेळी त्याचा तोल ढासळतो. पाय घसरून तो धाडकन जमिनीवर कोसळतो. नवरा-नवरीच्या पायाजवळ तो पडतो. त्यावेळी वेदनेने तो कळवळताना दिसतो. त्याच्या हाताला थोडी दुखापत झाल्याचं दिसतं.
हे वाचा - विकी-कतरीनाच्या लग्नाच्या फोटोसोबत व्हायरल होतोय चहावाल्याचा फोटो; कारण आहे खास
त्याच्यासोबत डान्स करणारे इतर तरुणही त्याची अवस्था पाहून घाबरतात. कसंबसं तो तरुण स्वतःला सांभाळतो आणि पुन्हा उभं राहून डान्स करू लागतो. स्टंट दाखवण्याच्या नादात दिराचा अपघात होतो. तो स्टेजवर कोसळतो. theweddingbrigade इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून सुरुवातीला धक्का बसतो पण नंतर हसूही आवरत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos