मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जग दिखाव्यावर चालतं, तरुणीनं केलं सिद्ध; पैसे खर्च न करता ‘जगून दाखवलं’!

जग दिखाव्यावर चालतं, तरुणीनं केलं सिद्ध; पैसे खर्च न करता ‘जगून दाखवलं’!

दिखाऊ जगात केवळ श्रीमंती थाट दाखवला, तरी ऐशोआरामाचं आयुष्य जगता येऊ शकतं, हे एका तरुणीनं तिच्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं आहे.

दिखाऊ जगात केवळ श्रीमंती थाट दाखवला, तरी ऐशोआरामाचं आयुष्य जगता येऊ शकतं, हे एका तरुणीनं तिच्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं आहे.

दिखाऊ जगात केवळ श्रीमंती थाट दाखवला, तरी ऐशोआरामाचं आयुष्य जगता येऊ शकतं, हे एका तरुणीनं तिच्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं आहे.

  • Published by:  desk news

बिजिंग, 9 डिसेंबर: एकही पैसा खर्च न करता (without spending money) केवळ दिखाव्याच्या जोरावर एका तरुणीनं ऐश (Enjoyment) केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीकडे अजिबात पैसे नव्हते. मात्र जग हे पैशांइतकचं दिखाव्यावर (Show) चालतं, ही म्हण तिने सिद्ध करून दाखवली आहे. केवळ श्रीमंतांसारखं (Rich) वागून श्रीमंत असल्याचा आभास निर्माण करता येऊ शकतो आणि श्रीमंती आयुष्य जगता येऊ शकतं, हे तरुणीनं सिद्ध करून दाखवलं आहे. तिच्या या प्रयोगाचं केवळ चीनमध्येच नव्हे, तर जगभर आश्चर्य व्यक्त होत आहे.

तरुणी बदलली देहबोली

चीनमधील जोऊ याक्री ही 23 वर्षांची तरुणी कला शाखेची विद्यार्थिनी आहे. तिने एक प्रयोग म्हणून श्रीमंती थाटात राहण्याची कल्पना शोधली. आपल्या प्रयोगातून तिला हे दाखवून द्यायचं होतं की चीनमध्ये पैसे नसतानाही केवळ श्रीमंत असल्याचा आव आणून कशा प्रकारे जगता येऊ शकतं. बिजिंगसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात ती कशा प्रकारे एकही रुपया खर्च न करता श्रीमंती आयुष्य जगू शकते, हे दाखवून देण्याचं तिनं ठरवलं आणि त्याची तयारी सुरू केली.

अशी केली तयारी

तरुणीनं सर्वप्रथम स्वतःची देहबोली बदलली. आपलं चालणं, बसण्याची पद्धत, बोलण्याची स्टाईल यावर काम केलं. त्यानंतर तिनं काही महागड्या ब्रँडचे कपडे खरेदी केले. डार्क लिपस्टिक लावली आणि एअरपोर्टच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये शिरण्यासाठी एक बनावट पास तयार करून घेतला. या जोरावर तिने लाउंजमध्ये प्रवेश मिळवला आणि तिथल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिनं वेगवेगळे पदार्थ ऑर्डर केले. तिच्याकडून कुणीही पैसे मागितले नाहीत. 3 दिवस ती या लाउंजमध्ये राहिली आणि मग पुढील प्रयोग करण्यासाठी बाहेर पडली.

केले श्रीमंती प्रयोग

या तरुणीनं त्यानंतर वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हजेरी लावली. तिथं तिनं मुक्काम, जेवण, स्विमिंग सर्व काही केलं. काही वेळा तर श्रीमंतांच्या ऑक्शनसाठीदेखील तिनं हजेरी लावली. तिथं काही बोलीदेखील लावल्या आणि तिथं भरपेट जेवण केलं.

हे वाचा - Interesting! महागड्या हॉटेलात फुकट डेझर्टसाठी नाटक, कपलनं केली Engagement

तिच्या या प्रयोगाचं चीनसोबत जगभर कौतुक होत आहे. ज्याला लोक सोशलाईट्स म्हणतात, तो वर्ग कसा दिखाऊपणे राहत असतो आणि आपली देहबोली बदलून कुणीही कसा त्याच प्रकारचं आयुष्य जगू शकतो, हे या तरुणीनं दाखवून दिलं.

First published:

Tags: China, Lifestyle, Small girl