जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Amazon-Flipkart-Myntra Sale : सुरू होतायत Festival sale; फसवणुकीचा धोका, अशी करा स्मार्ट Online shopping

Amazon-Flipkart-Myntra Sale : सुरू होतायत Festival sale; फसवणुकीचा धोका, अशी करा स्मार्ट Online shopping

Amazon-Flipkart-Myntra Sale : सुरू होतायत Festival sale; फसवणुकीचा धोका, अशी करा स्मार्ट Online shopping

Flipkart आणि Amazon या दोन्ही कंपन्यांच्या सेलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तूंवर डिस्काउंट ऑफर पाहायला मिळतील. यावरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार खरेदी करू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 सप्टेंबर : काही दिवसांत सणासुदीला सुरुवात होणार आहे. लोकांना सणासुदीला खरेदी करायला आवडते. बहुतेक कंपन्या या प्रसंगी खरेदीसाठी अनेक ऑफरदेखील देतात. सेलचे नाव ऐकताच लोक लगेच खरेदीचा विचार करू लागतात. सणासुदीच्या काळात लोक खरेदीची वाट पाहतात आणि मोठी यादी तयार ठेवतात. या आठवड्यात Flipkart, Amazon आणि Myntra सह अनेक ई-कॉमर्स कंपन्या त्यांचा सर्वात मोठा सेल घेऊन येत आहेत. अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या या सेलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तूंवर डिस्काउंट ऑफर पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते खरेदी करू शकता. ऑनलाइन शॉपिंगचे अनेक फायदे आहेत, परंतु त्यासोबत फसवणूक होण्याचा धोकादेखील असतो. सेलमध्ये खरेदी करताना, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील (Amazon-Flipkart Sale Sopping Tips) जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक टाळू शकाल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुम्ही फसवणुकीचे शिकार होणार नाही.

एक सेकंद थांबा! ऑनलाईन फोन घेताना तुम्ही तर करत नाही ‘या’ चूका, नाहीतर Offer पडेल महागात

वस्तू घेताना विक्रेता तपासा सेलमध्ये खरेदी करणारे ९० टक्के लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. खरेदीमध्ये विक्रेत्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. तुम्हाला तीच वस्तू अनेक विक्रेत्यांकडे मिळेल. परंतु तुम्ही ज्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून चांगले रेटिंग दिले आहे त्यांच्याकडून खरेदी करा. तुम्ही Amazon वरून खरेदी केल्यास Amazon फुलफिल्ड विक्रेत्यांकडून माल घ्या आणि जर तुम्ही Flipkart वरून खरेदी करत असाल तर तो विक्रेता सर्टिफाईड असावा.

जाहिरात

प्रॉडक्ट तपासा एक हुशार खरेदीदार त्याचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतो. खरेदीच्या वेळी बहुतेक लोक केवळ ऑफरवर लक्ष केंद्रित करतात. परंतु ते उत्पादनाची योग्य माहिती घेत नाहीत. जेव्हा तुम्ही Amazon किंवा Flipkart वरून एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा ते उत्पादन तपासा. त्या आयटमच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशील तपासा. किराणा मालाकडे विशेष लक्ष द्या Amazon आणि Flipkart दोन्ही बिग बिलियन डेज सेल आणि ग्रेट इंडियन सेल दरम्यान किराणा मालावर मोठ्या प्रमाणात सूट देतात. बहुतेक किराणा मालाची मुदत संपण्याची तारीख मर्यादित असते. कोणत्याही वस्तूची एक्सपायरी डेट त्याच्या वापराची कमाल मर्यादा ठरवते. अशा परिस्थितीत तुम्ही घेत असलेला माल तुम्ही किती दिवस वापरु शकता हे फार महत्वाचे ठरते. अनेक वेळा लोक स्वस्त किंमतीच्या हितासाठी असा माल घेतात जो काही दिवसांनी वापरता येत नाही. कॅशबॅक ऑफरमध्ये अडकू नका Flipkart आणि Amazon वापरकर्त्यांना वर्षातील त्यांच्या सर्वात मोठ्या सेलदरम्यान कॅशबॅक ऑफर करतात. अनेक वेळा ठराविक किंमत असूनही लोक कॅशबॅक प्रकरणात अडकतात. अशी चूक करू नका. कॅशबॅकमध्ये अनेक अटी आणि नियम लागू असतात. खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याकडे लक्ष द्या. रिव्हीव्यू आणि रेटिंगकडे लक्ष द्या हुशार खरेदीदाराने त्याला ऑफरवर मिळणाऱ्या सर्व वस्तूंचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाहीत याची आम्ही खात्री करू शकू. कोणतीही वस्तू खरेदी करताना, त्याच्या ग्राहकांचे रिव्हीव्यू आणि रेटिंग निश्चितपणे तपासा.

News18लोकमत
News18लोकमत

नो कॉस्ट ईएमआय टाळा विक्रीदरम्यान अनेकदा नो-कॉस्ट ईएमआय ऑफर केले जाते. यामध्ये वापरकर्त्यांना असे वाटते की जर त्यांनी ईएमआयवर कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्यांना व्याज द्यावे लागणार नाही, परंतु यामध्येही अनेक अटी लागू होतात. खरेदी करताना हे लक्षात ठेवा. प्रॉडक्टचे एमआरपी रेट तपासा ग्रेड इंडियन सेल आणि बिग बिलियन सेलमध्ये, तुम्हाला 80 टक्के सवलतीच्या ऑफर पाहायला मिळतात. अनेक वेळा लोक अशी सूट पाहून खरेदी करण्याचा निर्णय घेतात. परंतु येथे तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. काहीवेळा सवलत आणि किंमत यात फारच कमी फरक असतो. परंतु त्या उत्पादनाची एमआरपी खूप जास्त लिहिली जाते जेणेकरून तुम्ही फसू शकता. म्हणून प्रचंड सवलतीसह उत्पादन खरेदी करताना, इतर साइट्सवर देखील त्याची किंमत निश्चितपणे तपासा. रिटर्न पॉलिसी तपासा Amazon आणि Flipkart मध्ये अशा अनेक वस्तू आहेत. ज्यात फक्त एक्सचेंज पॉलिसी दिली जाते आणि रिटर्न पॉलिसी नाही. जर तुम्ही अशी कोणतीही वस्तू खरेदी करत असाल ज्यामध्ये तुम्हाला वाटते की तुम्ही ती परत करू शकता, तर खरेदी करण्यापूर्वी रिटर्न पॉलिसी निश्चितपणे तपासा. सुपर कॉइन्स वापरा तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करत असल्यास तुम्हाला सुपर कॉइन्सबद्दल माहिती असेलच. जेव्हा तुम्ही काही खरेदी करता तेव्हा तुम्हाला काही सुपर कॉइन्स दिले जातात. तुम्ही सेलदरम्यान सुपर कॉइन्स वापरल्यास अधिक पैसे वाचवू शकाल.

कायद्याचंबोला! ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर सारखा पाहायचा तरुणीचे स्टेटस, 5 वर्षांचा कारावास अन्..

डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्डने खरेदी करा Amazon आणि Flipkart चा आगामी सेल या वर्षातील सर्वात मोठा सेल आहे. दोन्ही कंपन्यांच्या सेलदरम्यान तुमच्या एटीएम म्हणजेच डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्डमध्ये अधिक ऑफर्स दिल्या जातात. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील आणि सेलचा फायदा घ्यायचा असेल. तर तुमच्याकडे असलेले क्रेडिट कार्ड वापरा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात