मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

4 लाखांना विकलं गेला हा दुर्मिळ Smiley अजगर; काय आहे त्याच्यावरील स्माईलीचं रहस्य

4 लाखांना विकलं गेला हा दुर्मिळ Smiley अजगर; काय आहे त्याच्यावरील स्माईलीचं रहस्य

अजगराच्या शरीरावर हे स्माईली आले तरी कसे?

अजगराच्या शरीरावर हे स्माईली आले तरी कसे?

अजगराच्या शरीरावर हे स्माईली आले तरी कसे?

जॉर्जिया, 11 मार्च : साप किंवा कोणताही अजगर समोर आला तर साहजिकच कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य येणार नाही. भीतीने घाबरगुंडी उडेल; पण समजा शरीरावर स्माइली असलेला अजगर समोर आला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असं असू शकेल, हे खरं वाटत नाही ना! पण ते खरं आहे.

आजचं युग जसं सोशल मीडियाचं आहे, तसंच स्माईलीचंही (Smiley) आहे. कारण सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी स्माईलींचा वापर केला जातो. अशाच तीन स्माईली अंगावर घेऊन एक अजगर अमेरिकेत जन्माला आला आहे.  पांढऱ्या अजगराच्या शरीरावरील पिवळ्या रंगाच्या स्माईली असलेल्या अजगराचीच चर्चा सर्वत्र आहे.

अमेरिकेत जॉर्जियात राहणारे स्नेक ब्रीडर जस्टिन कोबिल्का (Justin Kobilka) गेली 19 वर्षे अजगरांचं ब्रीडिंग (Python Breeding) करतात. यावेळी ते बॉल पायथॉनचं ब्रीडिंग करत होते. त्यातून जन्माला येणाऱ्या अजगराचा रंग सोनेरी पिवळा आणि पांढरा असा असावा, या दृष्टीने त्यांनी ब्रीडिंग केलं होतं. प्रत्यक्षात मात्र अजगर जन्माला आला, तेव्हा त्याची त्वचा पांढऱ्या रंगाची होती आणि त्यावर पिवळ्या रंगाच्या तीन स्माईली असल्याचं दिसून आलं. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

हे वाचा - ऑर्डर कॅन्सल केली म्हणून आला राग; डिलिव्हरी बॉयने महिलेसोबत काय केलं पाहा VIDEO

एका रेसेसिव्ह म्युटेशन (Recessive Mutation) म्हणजेच आपोआप झालेल्या जनुकीय बदलामुळे अजगराच्या त्वचेवर हा पॅटर्न पाहायला मिळाल्याचं जस्टिन कोबिल्का यांचं म्हणणं आहे. लवेंडर अल्बिनो पाइबाल्ड बॉल पायथन (Python) म्हणून तो ओळखला जातो.

जस्टिन कोबिल्का यांनी सीएनएन चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार, दर 20 प्राण्यांमागे एका प्राण्याच्या शरीरावर अशा स्माईली असतात. अर्थात स्नेक ब्रीडिंगच्या त्यांच्या 19 वर्षांच्या करिअरमध्ये एखाद्या अजगराच्या शरीरावर तीन स्माईली असल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं. हा अजगर त्यांनी तब्बल 6000 डॉलर्स अर्थात 4.37 लाख रुपयांना विकला. त्यामुळे अजगराबरोबरच जस्टिन यांच्याही चेहऱ्यावर हास्य खुललं असेल हे नक्की!

हे वाचा -  VIRAL VIDEO: बघिराने केली कुत्र्याची शिकार; ब्लॅक पँथरचा थरार CCTV मध्ये कैद

भारतातही चित्रविचित्र, भयंकर आणि दुर्मिळ साप कुठे कुठे दिसत असतात. वेळोवेळी त्याबद्दलच्या बातम्याही येत असतात. छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अल्बिनो मण्यार (Albino Krait) जातीचा एक दुर्मिळ साप सापडला होता. सूरजपूरच्या जयनगर नावाच्या गावात सापडलेल्या या सापाला वाचवण्यासाठी सर्पमित्राला बोलावण्यात आलं होतं. तर जून 2020 मध्ये उत्तर प्रदेशातल्या दुधवा नॅशनल पार्कमध्ये रेड कोरल कुकरी (Red Coral Kukry) जातीचा साप दृष्टिपथात आला होता. हा साप प्रामुख्याने निशाचर (Nocturnal) असतो आणि तो जास्तीत जास्त काळ जमिनीखाली वास्तव्य करतो. त्याआधी  ओडिशातल्या क्योंझर वन्यजीव अभयारण्याच्या ढेंकीकोट फॉरेस्ट रेंजमध्ये दुर्मिळ वुल्फ स्नेकही दिसला होता. त्या सापाला दोन तोंडं, चार डोळे आणि दोन जिभा होत्या. ग्रामीण भागातल्या लोकांनी हा दैवी चमत्कार असल्याचं समजून पूजा-पाठही केले होते.

First published:

Tags: International, Lifestyle, Python, Python snake, Snake