V नवी दिल्ली, 9 मार्च : सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल होणारे वन्य प्राण्यांचे (Animals) फोटो, व्हिडीओ हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असल्याचे आपण अनेकदा बघतो. यात प्रामुख्याने वन्य प्राणी शिकार करतानाच्या चित्तथरारक व्हिडीओंना युझर्सची सर्वाधिक पसंती मिळते. तसेच वन्य प्राण्यांच्या जीवनशैली विषयी विवेचन करणारे तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण व्हिडीओ देखील अनेक युझर्सच्या पसंतीस उतरतात. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील काबिनी जंगलातील काळ्या बिबट्याचे फोटो सोशल मिडीयावर सेन्सेशन ठरले होते. हे फोटो बघून अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं होतं. वनविभागाने सोशल मिडीयावर काळ्या रंगाचा बिबट्या शिकार करतानाचा व्हिडीओ नुकताच शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. काळ्या रंगाच्या बिबट्याने (Black Panther) रस्त्यावरील कुत्र्यावर (Dog) हल्ला केल्याचा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहून युझर्सने आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही व्हिडीओ क्लिप आयएफएस अधिकारी सुधा रामेन यांनी व्टिटरवर शेअर केली असून त्यात ही रक्तरंजित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, ती वेगाने व्हायरल देखील झाली आहे.
1 मिनिट 15 सेकंदाच्या या क्लिपमध्ये हा मायावी शिकारी कुठल्यातरी डोंगराळ प्रदेशातील मार्गावरुन चालला असल्याचे दिसते. हा पॅंथर एक मार्गावरुन फिरत असताना काही क्षणात या व्हिडीओत दिसेनासा होतो. त्यानंतरच्या दुसऱ्या सेकंदाला कुत्र्याचे जोरात भुंकणे ऐकू येते आणि शिकार करणारा तो बिबट्याच आहे असा अंदाज त्याला क्षणार्धात येतो. पुढच्याच व्हिज्युअलमध्ये तो बिबट्या त्या कुत्र्याला तोंडात धरुन त्या भागातून पळून जाताना दिसत आहे.
I need to rent this Panther. Too many stray dogs in my area
— Sandy Buddy (@Sanddybuddy) March 3, 2021
मायक्रो ब्लॉगिंग साईटसवर (Micro Blogging Sites) हाडं गोठवणारा हा व्हिडीओ पोस्ट करताना संबंधित अधिकाऱ्याने ही घटना कुठं घडलीय याचा उल्लेख केलेला नाही. मात्र या प्राण्याने दाट लोकवस्तीत येत आपल्या आवडत्या खाद्याची म्हणजेच कुत्र्याची शिकार केली असा उल्लेख केला आहे. रामेन यांची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ती आतापर्यंत सुमारे 25,000 जणांनी बघितली आहे. तसेच नेटिझन्सनी (Netizens) यावर आपलं मत कमेंटमध्ये व्यक्त केलं आहे.
Humans are the culprits of Mother Earth. We don't deserve it.#WorldWildlifeDay
— Anand Golchha (@Anandgolchha11) March 3, 2021
हे वाचा - ‘महिलांची जागा किचनमध्ये’; ‘बर्गर किंग’च्या टिप्पणीवर नागरिक संतापले; अखेर…
जंगलावर अतिक्रमण केल्याने आणि हिरवे आच्छादन कमी झाल्याने ही मोठी मांजर कदाचित मानवी वस्ती असलेल्या भागात शिकार करीत असावी, अशी कमेंट एका युझरने दिली आहे. मानव हाच पृथ्वीवरील अपराधी आहे, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युझरने दिली. त्या गरीब कुत्र्याबद्दल दुःख वाटले परंतु हाच निसर्ग आहे, असे तिसऱ्या युझरने म्हटलं आहे.