महिलेनं सांगितलं तिनं झोमॅटोवरून फूड ऑर्डर केलं होतं. तिनं कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला आणि वेळेत फूड न मिळाल्यानं डिलिव्हरी ऑर्डर कॅन्सल केली. कस्टमर केअरशी बोलल्यानंतर काही वेळात डिलिव्हरी बॉय तिथं आला. काही वेळानं डिलिव्हरी बॉय फूड घेऊन घरी पोहोचला. महिलेनं पार्सल घेण्यास नकार दिला. हे वाचा - एकमेकींच्या झिंझ्या उपटून जमिनीवर आपटलं, मॉलमध्ये शॉपिंगला गेलेल्या महिलांची WWF त्यानंतर डिलिव्हरी बॉइज भडकला आणि महिलेसोबत वाद घालू लागला. रागातच जबरदस्ती तिच्या घरात घुसून त्याने टेबलवरपार्सल ठेवलं आणि तिच्या नाकावर जोरात मुक्का मारून निघून गेला. डिलिव्हरी बॉयनं महिलेला इतक्या जोरात मारलं की तिच्या नाकातून रक्त वाहू लागलं. तिला बोलणंही शक्य होत नव्हतं. रुग्णालयात जाऊन तिनं स्वतःवर उपचार करून घेतले. शिवाय याबाबत तिनं बंगळुरू पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. त्यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचं आश्वासन दिलं आहे. हे वाचा - 'बाईची जागा स्वयंपाकघरात!' म्हणणाऱ्या अमेरिकन ब्रँडचा खरपूस समाचार; मागितली माफी दरम्यान झोमॅटो कंपनीनं महिलेची माफी मागितली आहे. तसंच महिलेला उपचारासाठी जी काही मदत लागेल ती करू आणि पोलीस तपासात सहकार्य करू असंही कंपनीनं सांगितलं. संबंधित डिलिव्हरी बॉयवर कठोर कारवाई करू आणि भविष्यात पुन्हा अशी घटना घडणार नाही, असं आश्वासनही कंपनीनं दिलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Zomato