जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Superfood : बदाम दुधाचे फायदे वाचून थक्क व्हाल; मिळते उत्तम आरोग्य आणि सौंदर्य

Superfood : बदाम दुधाचे फायदे वाचून थक्क व्हाल; मिळते उत्तम आरोग्य आणि सौंदर्य

Superfood : बदाम दुधाचे फायदे वाचून थक्क व्हाल; मिळते उत्तम आरोग्य आणि सौंदर्य

बदाम ज्याप्रमाणे शरीरासाठी उपयोगी (Almonds for Health) असतात त्याचप्रमाणे बदामाचे दूध (Almonds milk) देखील खूप उपयोगी असते. यामध्ये असलेल्या पोषक तत्वांचा शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : बदाम (Almonds) हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपोयोगी असते. योग्य प्रमाणात खाल्ल्यास बदामामुळे शरीराला (Almonds for Health) अनेक पोषक तत्व मिळतात. बदामाप्रमाणेच त्याचे दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ( Benefits of Almonds milk) असते. बदामाच्या दुधात शरीरासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन ई, लोह आणि मॅग्नेशियम आढळते. तसेच त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील आढळतात. यामुळे अनेक आजारांवर मात करण्यास मदत होते. विशेष म्हणजे या दुधात (Almond milk Benefits) कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट नसते आणि कॅलरीज देखील कमी असतात. त्यामुळे वजन कमी (weight loss) करण्यासाठी दे अत्यंत उपयुक्त असते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी : बदामाच्या दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-ई आढळते. तसेच यात आढळणाऱ्या अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बदामाचे दूध फायदेशीर ठरू शकते. हृदयासाठी उपयुक्त : बदामाचे दूध हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. बदामाचे दूध बॅडल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शखते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कुठलाही अठथळा निर्माण होत नाही आणि ह्रदय देखील निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

Anxiety Relief: ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

त्वचेसाठी उपयुक्त : बदामाचे दूध प्यायल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. बदामाच्या दुधात असणारे व्हिटॅमिन-डी त्वचेचा सुर्याच्या अतिनील किरणांपासून आणि हानिकारक बॅक्टेरियापासून बचाव करते तर व्हिटॅमिन-ईमुळे त्वचेला एक प्रकारचे संरक्षण कवच प्राप्त होते. यामुळे त्वचेचे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. डोळ्यांसाठी फायदेशीर : बदामाचे दूध डोळांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-डी आणि रिबोफ्लेविनसारखे डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले घटक आढळतात. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.

स्किन आणि केसांसाठी तिळाचा असा करा वापर; नॅचरली मिळतील अनेक पोषक घटक

केसांसाठी फायदेशीर : केसांसाठी बदाम जसे फायदेशीर असतात तसेच निरोगी आणि लांब केंसासाठी बदामाचे दूध खूप फायदेशीर ठरू शकते. यात आढळणारे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि टोकोफेरॉलसारखे घटक केसांसाठी अतिशय उपयुक्त असतात. हाडांसाठी उपयुक्त : बदामाच्या दुधात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियम आढळते. त्यामुळे हे दूध पिल्याने हाडे मजबूत होण्यासाठी आणि हाडांचा विकास होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे बदामाचे दुध मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात