Home /News /lifestyle /

मातृत्वासाठी अस्तित्व विसरणं आवश्यक? Fashion Bloggerने विचारलेला प्रश्न तुम्हाला पडला होता?

मातृत्वासाठी अस्तित्व विसरणं आवश्यक? Fashion Bloggerने विचारलेला प्रश्न तुम्हाला पडला होता?

काम करावं कि न करावं. केलं तर, कोणतं करावं ही निवड करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. पण, आई झाल्यावर (Motherhood) एकट्या स्त्रिचंच आयुष्य बदलतं...

  नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : आई होण्याची भावना खूप खास (Special Emotion) असते. मातृत्वाचा आनंद आई झाल्यावरच कळतो. बाळाची चाहूल लागताच स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. बाळ जन्मल्यानंतर आईला अनेक बदलाला सामोर जावं लागतं. हे बदल शारीरिक आणि मानसिक (Changes Physical & Mental) असतात. बाळ झाल्यावर तिला स्वप्नांना(Dream)मुरड घालावी लागते. काही कुटुंबात बाळ झाल्यावर स्त्रिला तिच्या जबादाऱ्यांमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला जातो. फॅशन ब्लॉगर आणि YouTuber रोशनी भाटिया (Fashion Blogger and YouTuber Roshni Bhatia) यांनी आपल्या स्टाईलमध्ये हाच चाकोरीबद्ध विचार दूर सारला आहे. त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Social Media) आपले विचार मांडले आहेत. त्यांनी अतिशय स्टायलिश पद्धतीने मातृत्वाशी संबंधित अनेक स्टिरिओटाइप (Stereotype) तोडले आहेत.रोशनी भाटियाने @thechiquefactor नावाच्या तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) हँडलवरून एक व्हिडिओ (Video)पोस्ट केला आहे. यात त्या खूप सुंदर दिसत आहेत. व्हीडिओ सुरू होताना त्या एक सुंदर ड्रेस घालून येताना दिसतात. (शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती) व्हिडिओ पोस्ट करताना रोशनी यांनी सुंदर वाक्य लिहिलं आहे. ज्यात त्या मातृत्वाशी संबंधित अनेक स्टिरियोटाइपला त्यांच्या स्टाईलमध्ये धक्का लावत आहे. मेक-अप आणि बॅकलेस ड्रेस घालून त्या सर्कास्टिकल लोकांना सांगतांत की, मातृत्व म्हणजे एखाधद्या पिंजऱ्यात कैद होणं नाही.
  (हे पदार्थ वाढवतील कोरोनाचा धोका; बचावासाठी बदला खाण्या-पिण्याच्या सवयी) हा व्हीडिओ रोशनी यांनी खास आई झालेल्या आणि बाळाच्या संगोपनात गुंतलेल्या महिलांसाठी तयार केला आहे. त्यांच्यामते आई झाल्यावर लगेच फक्त पारंपारिक कपडे घालून, कुटुंब आणि मुलांनाच महत्त्व द्यावं आणि महिलांनी काम केलं नाही तरी चालेल असा विचार चुकीचा आहे. महिलांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी विकत घेण्याची आवश्यकता नसते, महिलांनी मेकअप करण्यात वेळ वाया घालवू नये आणि मुलांसाठी पैसे वाचले पाहिजेत असा विचार करणाऱ्यांना रोशनी यांनी चुकीचं सिद्ध केलं आहे. रोशनी यांनी दुसऱ्या लग्नानंतर आपल्या सुखी संराला सुरुवात केली आहे. त्याआधी त्यांच्या पहिल्या लग्नामुळे त्यांना अनेक बंधनात जगावं लागत होतं. त्यांना स्वतंत्र जगण्याची मुभा नव्हती. त्यांना एक मुलगा आहे त्यालाच त्या आपला बेस्ट फ्रेन्ड मानतात. (मेडिटेशन करायला आवडतं, पण झोप येते म्हणून टाळता? टेन्शन नको; करा ‘हे’ उपाय) रोशनी यांच्यामते, आई होण्याचा अर्थ महिलांनी स्वप्नं सोडून द्यावीत असा होत नाही. काम करावं कि न करावं केलं तर कोणतं करावं याची निवड करण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा असं त्या मानतात.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Lifestyle, Parents and child, Small child

  पुढील बातम्या