मुंबई : तुम्ही माना किंवा मानू नका पण आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींच्या असण्याचा, त्यांचा आकाराचा काही ना काही अर्थ हा नक्कीच असतो. आपण त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. पण त्या गोष्टी कळत-नकळत आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात. तुम्ही अनेक लोकांना हे करा किंवा हे करु नका, तसेच या गोष्टी याच वेळेवर करा, अशा गोष्टीं सांगताना पाहिलं असेल, पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. असं असलं तरी आठवड्याच्या सात दिवसांपैकी प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी राखीव ठेवला गेला आहे. ज्यामुळे त्या दिवशी काय करावे किंवा काय करु नये, असे सांगितले जाते. जसे केस धुणे, केस कापणे, नखे कापणे इ.
आज या लेखात भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा आपल्याला त्या दिवसांबद्दल सांगत आहेत ज्या दिवशी नखे कापण्यास मनाई आहे. प्रचलित समजुतीनुसार, काही विशिष्ट दिवसांमध्ये नखे कापली गेली तर एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो आणि त्याच्या आयुष्यात गरिबी येऊ शकते. मग आता प्रश्न असा उपस्थीत राहातो की कोणत्या दिवशी नख कापू नये किंवा कापावे. चला याबद्दल जाणून घेऊ. Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि… कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी नखे कापू नयेत? मंगळवार : ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने मंगळवारी नखे कापली तर असे मानले जाते की त्या व्यक्तीचे भावापासून दुरावण्याची शक्यता असते. त्यांच्या धाडसात आणि शौर्यामध्ये घट होऊ शकते. याशिवाय व्यक्तीला नखांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गुरुवार: ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने गुरुवारी नखे चावली तर त्या व्यक्तीचे शिक्षण आणि ज्ञान कमी होऊ शकते, तसेच त्याला पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शनिवार : ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने शनिवारी नखे कापली तर असे मानले जाते की यामुळे त्याचे आयुष्य कमी होते आणि त्याच्या घरात गरीबी वाढते.nailslifest नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर अवलंबून आहे. न्यूज १८ लोकमत त्याची कोणतीही पुष्टी करत नाही.