Home /News /lifestyle /

लाखमोलाची झोप! शांत झोपेसाठी तरुणीला मोजावे लागले तब्बल 35 लाख

लाखमोलाची झोप! शांत झोपेसाठी तरुणीला मोजावे लागले तब्बल 35 लाख

काळ्या रंगाचा रक्तस्त्राव अनियमीत पिरेड असणाऱ्या महिलांना होतो. प्लेटलेट कमी झाल्या असतील जास्त ऑक्सिडेशनमुळे काळ्या रंगाचा रस्तस्त्राव होतो.

काळ्या रंगाचा रक्तस्त्राव अनियमीत पिरेड असणाऱ्या महिलांना होतो. प्लेटलेट कमी झाल्या असतील जास्त ऑक्सिडेशनमुळे काळ्या रंगाचा रस्तस्त्राव होतो.

तरुणी 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ झोपूच (sleep) शकत नव्हती.

ब्रिटन, 02 फेब्रुवारी : प्रत्येकाच्या आयुष्यात झोप महत्त्वाची असते. शांत आणि पुरेशी झोप न मिळाल्यास अनेक समस्या उद्भवतात. पण काही कारणांमुळे अशी शांत आणि पुरेशी झोप मिळतही नाही. अशाच समस्येचा सामना करणाऱ्या यूकेतील एका तरुणीला झोपेसाठी तब्बल 35 लाख रुपये मोजावे लागले. तेव्हा कुठे तिला शांत झोप मिळाली. यूकेमधील लेसेस्टरशायरमधील हफटन ऑफ द हिल येथील 22 वर्षीय रुबी चेंबरलेन ही तरुणी वयाच्या आठव्या वर्षापासून एका दुर्मिळ आजारानं त्रस्त आहे.  रुबीला पहिल्यांदा जेव्हा वेदना जाणवू लागल्या तेव्हा तपासणी केली असता तिला कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम (Complex Regional Pain Syndrome) म्हणजे सीआरपीएस हा आजार झाल्याचं निदान झालं. हा दुर्मिळ आजार लाखात एका व्यक्तीला होतो. या आजाराचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण रुग्णाच्या हात आणि पायाला तीव्र वेदना होतात. त्यांना सातत्याने शारिरीक वेदना होतात आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. स्वतःच्या स्थितीबाबत रुबी सांगते की, शस्त्रक्रियेपूर्वी अतिवेदनांमुळे मी 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ झोपू शकत नव्हतं. यामुळे दररोज काही काळ मला आखडून गेल्यासारखं वाटायचं. सीआरपीएसमुळे (CRPS) माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला. अपुऱ्या झोपेची समस्या जडली. त्यातच मित्रांसह नातेवाईकांना भेटणंही अशक्य होऊ लागलं. माझी नोकरीही गेली. या विकारावर मात करण्यासाठी मी पेनकिलर्सचा (Painkillers) वापर, फिजिओथेरपीसारखे (Physiotherapy) उपाय केले. हे वाचा - शेतकऱ्याचं हृदय वेळेत पोहोचवण्यासाठी सरसावली मेट्रो लॅडबायबलच्या बातमीनुसार, अखेरीस 35,000 डालर्स म्हणजे जवळपास 35 लाख रुपये खर्च करून तिनं मणक्याची शस्त्रक्रिया (Spinal Cord Stimulation) केली. ऑगस्ट 2020 मध्ये रुबीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवेळी बॅटरी पॅकच्या आकाराचा पेसमेकर तिच्या हाताच्या त्वचेखाली बसवण्यात आला. या पेसमेकरचे इलेक्ट्रोड तिच्या मणक्याला जोडण्यात आले. यूकेतील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमार्फत (National Health Service) ही शस्त्रक्रिया व्हावी, अशी तिची विनंती नाकारली गेली. लोकांनी अर्थिक मदत केल्यानंतर तिला ही शस्त्रक्रिया करणं शक्य झालं आणि ती वेदनामुक्त झाली. रुबी आता किमान पुरेसा वेळ झोपू शकते.  तिच्या शरीरात बसवण्यात आलेली यंत्रणा तिला झोपण्यासाठी मदत करते. झोपेपूर्वी ती रिमोट कंट्रोलचं एक बटण दाबते, यामुळे वेदनेची जाणीव करून देणाऱ्या लहरी ब्लॉक होतात. या शस्त्रक्रियेमुळे ती आता पुरेशी झोप घेऊ शकते, तसंच सर्व अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होऊ शकते. हे वाचा - अमेरिकेच्या विरोधानंतरही पत्रकार Daniel Pearl यांच्या मारेकऱ्याची मुक्तता; सुरक्षितपणे घरी पाठवलं स्पायनल कार्ड स्टिम्युलेशन सर्जरीमुळे रुबीचं आयुष्य बदललं आहे. वेदनेची तीव्रता आता 80 टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानं तिचं दैनंदिन जीवन सुधारत आहे. रुबी आता कुटुंबियांसोबत डायनिंग टेबलवर बसून जेवण करू शकते. रुबी आता योगा करण्यासोबत तास न तास बसू शकते तसेच मोकळेपणाने चालू शकते. या गोष्टी ती सीआरपीएस या विकारामुळे यापूर्वी करू शकत नव्हती. आता तिला पुन्हा क्लबमध्ये जाण्याची इच्छा आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Health, Health Tips, Sleep, United kingdom

पुढील बातम्या