मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /शेतकऱ्याचं हृदय वेळेत पोहोचवण्यासाठी सरसावली मेट्रो; माणुसकीबरोबर तंत्रज्ञानाचं संवेदनशील दर्शन

शेतकऱ्याचं हृदय वेळेत पोहोचवण्यासाठी सरसावली मेट्रो; माणुसकीबरोबर तंत्रज्ञानाचं संवेदनशील दर्शन

पहिल्यांदाच हृदयाचा प्रवास अशा प्रकारे मेट्रोतून झाला. ट्रॅफिकमध्ये न अडकता वेळेत ते गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचलं आणि शेतकऱ्याच्या दानाचं चीज झालं.

पहिल्यांदाच हृदयाचा प्रवास अशा प्रकारे मेट्रोतून झाला. ट्रॅफिकमध्ये न अडकता वेळेत ते गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचलं आणि शेतकऱ्याच्या दानाचं चीज झालं.

पहिल्यांदाच हृदयाचा प्रवास अशा प्रकारे मेट्रोतून झाला. ट्रॅफिकमध्ये न अडकता वेळेत ते गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचलं आणि शेतकऱ्याच्या दानाचं चीज झालं.

हैदराबाद, 2 फेब्रुवारी : अवयवदानाबाबत (organ donation) देशात (country) आता बरीच जागृती होते आहे. गरजूला वेळेत मदत करत त्याचे प्राण वाचवण्याची घटना नुकतीच घडली आहे. यासाठी मेट्रो कामाला आली

एका कुटुंबानं मोठ्याच माणुसकी आणि संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं. या कुटुंबातला एक सदस्य ब्रेन डेड (brain dead) झाला होता. त्याचं हृदय (heart) एका गरजू व्यक्तीला देऊन या कुटुंबानं त्या व्यक्तीचा जीव वाचवला. या जीवनदान मिळालेल्या कुटुंबाला दात्याच्या (donor) आभार कसे मानावेत हे कळेनासं झालं.

दरम्यान, या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आलेलं हृदय हैद्राबाद मेट्रोमधून (Hyderabad metro) यशस्वीपणे संबंधित व्यक्ती होती त्या हॉस्पिटलपर्यंत (hospital) नेण्यात आलं. अपोलो हॉस्पिटलनं मेट्रो रेल्वे अधिकाऱ्यांच्या (metro officials) मदतीनं या हृदयाचं सुरक्षितपणे वहन केलं.

नालगोंडा जिल्ह्यातील 45 वर्षांचा शेतकरी (farmer) ब्रेन डेड (brain dead) झाला. या शेतकऱ्याचे कुटुंबीय अगदी उत्स्फूर्तपणे अवयवदान करायला तयार झाले. हे हृदय दुसऱ्या गरजू माणसाला दिलं गेलं.

हा गरजू माणूस जुबिली हिल्सच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची तयारी तोवर तिथल्या डॉक्टरांनी केली. ट्रॅफिकचा आणि इतर अडथळ्यांचा अंदाज घेऊन डॉक्टरांनी उप्पल ते ज्युबिलीहिल्स चेकपोस्ट हा मार्ग निवडला. मेट्रो अधिकाऱ्यांनी आधी कळवल्याप्रमाणे सगळी गरजेची तयारी करत आवश्यक ती खबरदारी यादरम्यान घेतली. यातूनच हृदयाचा अपेक्षित स्थळी सुरक्षित प्रवास होऊ शकला.

First published:

Tags: Farmer, Hyderabad, Metro, Organ donation