जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! 8 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेचं Heavy workout; तब्बल 150 किलो वजन उचललं आणि...

OMG! 8 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेचं Heavy workout; तब्बल 150 किलो वजन उचललं आणि...

OMG! 8 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेचं Heavy workout; तब्बल 150 किलो वजन उचललं आणि...

प्रेग्नंट महिलेचे (Woman heavy workout during pregnancy) हे व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा शॉक व्हाल.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 22 मे : प्रेग्नन्सी म्हटलं की महिलांची विशेष काळजी घेतली जाते. या काळात आहारासह शारीरिक हालचालही महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रेग्नन्सीत काही सौम्य असे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. पण जास्त वजन उचलू नये, असं सांगितलं जातं. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका प्रेग्नंट महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येक जण शॉक झाला आहे. प्रेग्नन्सीच्या आठ महिन्यानंतरही ही महिला जीममध्ये हेव्ही वर्कआऊट (Woman heavy workout during pregnancy) करत आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये  राहमारी 34 वर्षांची याना मिलुटोनोविक. सध्या 8 महिन्यांची प्रेग्नंट आहे (8 Months pregnant woman heavy workout). तिच्या डिलिव्हरीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थिती आराम करून स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्याऐवजी ती जीममध्ये दिसते आहे. फक्त जीममध्ये जातच नाही तर तिथं वर्कआऊटही करते, तेसुद्धा हेव्ही वर्कआऊट.

जाहिरात

यानाने आपल्या 8 महिन्यांच्या पोटासह हेव्ही वर्कआऊट करताने अनेक फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे असे बरेच व्हिडीओ पाहायला मिळाले आहेत. हे वाचा -  Period मिस होण्याआधीच जाणीव होईल Pregnancyची; ही आहेत लक्षणं व्हिडीओ पाहताच क्षणी आपल्या तोंडातून अरे बापरे! असेच उद्गार येतील. महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याबाबतही चिंता वाटू लागेल. अशाच काही प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरही उमटत आहेत. या महिलेला ट्रोल केलं जातं आहे. एका युझरने अशा खतरनाक एक्सरसाइज करून ही महिला आपल्या बाळाचा जीव घेऊ इच्छित आहे, असा आरोप केला आहे. तर एका युझरने या महिलेला स्वतःकडे सर्वांचं लक्ष खेचून घेण्याचं जास्तच शौक आहे, असं म्हटलं आहे. हे वाचा -  सासरी येताच नववधूने नवरदेवासोबत केलं असं काही; VIDEO पाहूनच चक्रावून जाल यानाने ट्रोलर्सना घाबरून आपलं वर्कआऊट थांबवलं नाही. उलट तिने नवे व्हिडीओ शेअर करत या ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे आणि सर्वांची बोलती बंद केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात