मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरे बापरे! सासरी येताच नववधूने नवरदेवासोबत केलं असं काही; VIDEO पाहूनच चक्रावून जाल

अरे बापरे! सासरी येताच नववधूने नवरदेवासोबत केलं असं काही; VIDEO पाहूनच चक्रावून जाल

नवविवाहित दाम्पत्याचा (Bride groom video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे.

नवविवाहित दाम्पत्याचा (Bride groom video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे.

नवविवाहित दाम्पत्याचा (Bride groom video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 21 मे : नववधू (Bride) घरात आली की तिच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, तिला काय आवडतं, काय नाही आवडत, आपल्यासोबत ती कशी वागेल, असे प्रश्न तसे तिच्या सासरच्या प्रत्येकाला पडलेले असतात. पण तिच्याबाबत जाणून घेण्याची सर्वात जास्त उत्सुकता असते ती तिच्या नवऱ्याला. नववधू सासरी आल्यानंतर ती काय करेल, कसं करेल याचं सर्वात जास्त टेन्शन असं ते नवरदेवाला (Groom). सध्या अशाच एका नवविवाहित दाम्पत्याचा (Bride groom video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो. ज्यात नववधूने नवरदेवासोबत असं काही केलं आहे, जे पाहूनच तुम्ही हैराण व्हाल.

नववधू घरी येताच आपल्या नवऱ्यावर हात उचलला आहे (Bride slaps groom). सर्वांच्यासमोर नवरदेवाच्या कानशिलात तिने लगावली आहे. नवरदेवाला मारून तिने पळण्याचाही प्रयत्न केला. हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला तुम्हालाही शॉक बसेल.

व्हिडीओत पाहू शकता. नवरदेव एका ठिकाणी बसला आहे. त्याच्यासमोर काही गिफ्ट्स आहेत आणि त्याची नववधूही आहे. आजूबाजूला या दोघाचं कुटुंब, नातेवाईक आणि इतर  काही लोकही आहेत. नववधू नवरदेवाला गिफ्ट्स दाखवताना दिसते आहे. त्याचवेळी ती संधी साधून नवरदेवाच्या कानशिलात लगावते. नवऱ्याला मारून तिथून पळण्याचा प्रयत्न करते पण तितक्यात तिचा नवरा तिचा हात घट्ट धरून ठेवतो.  पळण्याच्या आणि पकडण्याच्या झटापटीत दोघंही जमिनीवर पडतात.

हे वाचा - मॉडेलसोबत रोमान्स करताना अचानक आली बायको; लपण्याच्या धडपडीत गायकाने गमावला जीव

पण हे सर्व होत असताना वर-वधू आणि इतर लोकही हसताना दिसतात. आता याचं कारण काय? तर या व्हिडीओत बायकोने आपल्या नवऱ्याला केलेली मारहाण खरी नाही आहेत, तर रितीरिवाजाचा एक भाग आहे. लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज असतात. काहीकाही परंपरा तर खूपच विचित्र असतात. लग्नानंतर वर-वधूला घरी आल्यानंतर त्या दोघांमध्ये काही खेळ होता. अंगठी शोधणं, एकमेकांच्या तोंडात पदार्थ ठेवून खायला लावणे हे खेळ तर परिचयाचे आहेत. अशाच काही खेळांपैकी पण आपल्या माहिती नसलेला असा हा एक खेळ आहे.

हे वाचा - आई-वडिलांना दाखवलेलं लेटर पाहून दोघेही हैराण, 80 लाखांहून अधिक वेळा पाहिला VIDEO

लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी हा खेळ रंगतो. नवरा आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांसोबत अंगणात बसतो आणि महिला त्याची खिल्ली उडवत असतात. त्याची नववधू त्याला कानशिलात लगावून पळते पण नवरदेव तिचा हात पकडतो.

First published:

Tags: Bridegroom, Funny video, Marriage, Relationship, Viral, Viral videos, Wedding