मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Period मिस होण्याआधीच जाणवतील Pregnancy ची ही लक्षणं

Period मिस होण्याआधीच जाणवतील Pregnancy ची ही लक्षणं

फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असतं. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त पाण्याची गरज नसते पण, फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्यामुळे आपल्याला उलटी किंवा मळमळ असा त्रास होऊ शकतो.

फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असतं. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त पाण्याची गरज नसते पण, फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्यामुळे आपल्याला उलटी किंवा मळमळ असा त्रास होऊ शकतो.

पुर्वीच्या काळी प्रेग्नेन्सी किट नसतानाही आई होण्याची चाहुल ओळखली जायची. गर्भवती (Pregnant) झाल्यानंतर शरीरात अनेक बदल (Many changes in the body) होतात. या बदलांमुळे आपण आई होणार आहोत याची जाणीव होऊ शकते.

    मुंबई, 21 मे: आई होण्याची इच्छा असेल्या प्रत्येक महिलेला ती चाहुल हवीहवीशी वाटते. त्यासाठी पिरिअड (Period) मिस झाल्यावर प्रेग्नन्सी किट (Pregnancy kit)ने चेक केल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. प्रग्नेन्सी किटने प्रेग्नेन्सीबद्दल नक्कीच खरी माहिती मिळते.  पण, पुर्वीच्या काळी प्रेग्नेन्सी किट नसतानाही आई होण्याची चाहुल ओळखली जायची. गर्भवती (Pregnant) झाल्यानंतर शरीरात अनेक बदल (Many changes in the body) होतात. या बदलांमुळे आपण आई होणार आहोत याची जाणीव होऊ शकते. गर्भ राहिल्यानंतर (After conceiving) सुरवातीच्या काळात शरीरात काही बदल व्हायला लागतात. अमर उजाला ने काही तज्ज्ञांच्या हवाल्याने यासंबंधी लेख लिहिला आहे. या बदलांकडे लक्ष दिल्यास आपण आई होणार आहोत हे पिरेड मिस होण्याआधीचं कळतं. (घरबसल्या COVID-19 चाचणी शक्य, वाचा Home Testing Kit बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरं) उलटी येणे उलट्या (Vomiting) होणे हे गर्भधारणेचे एक सामान्य लक्षण आहे. एस्ट्रोन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये वाढ झाल्याने खुप उलट्या होतात. बर्‍याच महिलांना सकाळी उलट्या होतात आणि घाबरल्या सारखे वाटतं. त्याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. दररोज उलट्या होणे हे गर्भधारणेचं लक्षण आहे. पिरेड मिस होण्याआधी 80 टक्के स्त्रियांना उलट्या होतात. (तुम्ही योग्य वेळेला अंघोळ करताय ना? उठल्या उठल्या शॉवर घेणंही ठरू शकतं धोकादायक) स्तन जड वाटणे हे गर्भधारणेचं पहिलं लक्षण आहे. गर्भधारणे नंतर, स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते. ज्यामुळे त्यांच्या स्तनांमध्ये वेदना होतात आणि स्तनांचं वजन वाढयला लागतं. स्तनाग्रांचा रंग गडद होऊ लागतो, त्याला खाज सुटणे किंवा टोचत असल्याची जाणीव होते. घसा खवखवणे घशात खवखव जाणवते. सुरवातीच्या काळात दिसणारी ही लक्षणं गर्भारपणातही राहतात. थकवा जाणवणे गर्भ वाढत असताना,शरीरात अधिक रक्त तयार होते,ज्यामुळे थकवा वाढतो. अशा परिस्थितीत अधिकाधिक विश्रांती घेणं चांगलं. (शारीरिक संबंधांसाठी BFसमोर ठेवलेली अट महागात; तीनदा गाठलं हॉस्पिटल, अखेर ब्रेकअप) जास्त झोप गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे सुरूवातीच्या काळात सतत झोपा येत राहते आणि खूप थकवा जाणवतो. प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे अधिक झोप येते. ही लक्षणं जवळजवळ तीन महिन्यांपर्यंत दिसतात. खास पदार्थाची इच्छा गरोदरपणाच्या सुरूवातीला अचानक आपला आवडता पदार्थ खाण्याची इच्छा होते. आंबट आणि तीखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. मूड स्विंग होणे या कालावधीत अनेक महिलांमध्ये भावनात्मक प्रतिक्रिया वाढतात. रागावणे आणि रडणे असे बदल होऊ शकतात. सतत मूड बदलत असेल तर, घाबरू नये. याकाळात थोडी विश्रांती घेतल्यानंतर बरं वाटतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Period, Pregnancy, Pregnant woman

    पुढील बातम्या