• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • ऐकावे ते नवल! एकाचं वर्षात ही महिला झाली 2 वेळा गर्भवती; दिला 4 बाळांना जन्म

ऐकावे ते नवल! एकाचं वर्षात ही महिला झाली 2 वेळा गर्भवती; दिला 4 बाळांना जन्म

जेसिकाला या चार मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगीही आहे.

  • Share this:
मुंबई, 5 ऑगस्ट- नैसर्गिक म्हणा किंवा वैद्यकीय नियमांनुसार म्हणा एखादी महिला एका वर्षात साधारणपणे एकदाच गरोदर राहू शकते. कारण गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतचा काळ नऊ महिन्यांचा असतो. यातही जर जुळी किंवा तिळी झाली, तर एका वर्षात ती महिला जास्तीत जास्त तीन मुलांची आई होऊ शकते. मात्र, इंग्लंडमधील एका 31 वर्षीय महिलेने एकाच वर्षात तब्बल दोन वेळा प्रेग्नन्ट (England woman twice pregnant in on year) होऊन, चार मुलांना जन्म दिला आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, जेसिका प्रिचर्ड (Jessica Pritchard) असं या महिलेचं नाव आहे. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या जेसिका इंग्लंडच्या दक्षिण यॉर्कशायर (England teacher four kids in a year) भागात राहतात. 2020च्या मे महिन्यात जेसिकाने एका मुलीला जन्म दिला होता. यानंतर अकरा महिन्यांनी, म्हणजेच 2021च्या एप्रिल महिन्यात त्यांनी चक्क तिळ्यांना जन्म दिला. याबाबत डेली मेलशी बोलताना जेसिका म्हणाल्या, की “लॉकडाउनच्या काळात आम्ही बऱ्याच आव्हानांना सामोरे गेलो. मात्र, हा काळ आमच्यासाठी मोठ्या प्रमाणात आनंददायीही ठरला. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये (woman twice pregnant in lockdown) आम्ही एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर एका वर्षाच्या आतच मला तीन मुलं झाली. माझ्यासाठी आणि माझ्या पतीसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.” (हे वाचा: मंदिरात पुजाऱ्यासोबत आढळली महिला; नागरिकांनी दोघांना बाहेर काढून केली मारहाण) जेसिकाला या चार मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगीही आहे. त्यांची आठ वर्षांची मुलगी मॉली ही आपल्या चारही भावंडांची देखभाल करण्यात आईला मदत करत आहे. जेसिका म्हणाल्या, की कोरोना काळात परिस्थिती आधीच बऱ्यापैकी बिकट आहे. त्यातच चार मुलांचे (Four Kids in one year) पालन पोषण करणं थोडं अवघड जाणार आहे. हे आमच्यासाठी आव्हान असणार आहे, मात्र आम्ही यासाठी तयार आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे जेसिका एकट्याच सोनोग्राफीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिथल्या सोनोग्राफरने त्यांना जुळी मुलं होणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. हे ऐकूनच जेसिका आश्चर्यचकित झाल्या होत्या. मात्र, सोनोग्राफरने पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांना जुळे नाही, तर तिळे होणार असल्याचं स्पष्ट झालं. हे ऐकून जेसिका यांना काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजलं नाही. (हे वाचा: पाकिस्तानात अजब लग्न, तरुणानं हिंदू पद्धतीनं बकरीसोबत घेतले 7 फेरे, पाहा Video  ) जेसिका यांनी घरी गेल्यानंतर आपल्या पतीला तिळ्या मुलांबाबत सांगितलं. त्यांच्या पतीला यावर आधी विश्वासच बसला नाही. मात्र, जेसिकांनी स्कॅनिंग रिपोर्ट्स दाखवल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. अर्थात, ही आश्चर्याची असली तरी आनंदाची गोष्ट असल्याचे दोघांनी म्हटले आहे.
First published: