मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Corona Symptoms: नवीन कोरोना रुग्णांमध्ये दिसतायत वेगळे 3 प्रकार; घसादुखीतील झालेला बदल त्रासदायक

Corona Symptoms: नवीन कोरोना रुग्णांमध्ये दिसतायत वेगळे 3 प्रकार; घसादुखीतील झालेला बदल त्रासदायक

Corona symptoms: डॉ. सतीश सांगतात की, कोरोनाच्या नवीन रुग्णांवर बारकाईने नजर ठेवल्यानंतर 3 मोठे बदल दिसत आहेत. यातील पहिला बदल कोरोनाच्या इन्‍क्‍यूबेशन पीरियडमध्ये, म्हणजेच त्याच्या संसर्गाच्या कालावधीशी संबंधित आहे.

Corona symptoms: डॉ. सतीश सांगतात की, कोरोनाच्या नवीन रुग्णांवर बारकाईने नजर ठेवल्यानंतर 3 मोठे बदल दिसत आहेत. यातील पहिला बदल कोरोनाच्या इन्‍क्‍यूबेशन पीरियडमध्ये, म्हणजेच त्याच्या संसर्गाच्या कालावधीशी संबंधित आहे.

Corona symptoms: डॉ. सतीश सांगतात की, कोरोनाच्या नवीन रुग्णांवर बारकाईने नजर ठेवल्यानंतर 3 मोठे बदल दिसत आहेत. यातील पहिला बदल कोरोनाच्या इन्‍क्‍यूबेशन पीरियडमध्ये, म्हणजेच त्याच्या संसर्गाच्या कालावधीशी संबंधित आहे.

नवी दिल्ली, 10 जून : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 5223 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढू शकतो. विशेष म्हणजे कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये पूर्वीपेक्षा काही नवीन लक्षणे दिसून येत आहेत. एवढेच नाही तर कोरोनापासून रिकव्हरीबाबतही बदल होताना दिसत आहेत. कोरोना विषाणू संपण्याचे नाव घेत नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि तो संपुष्टात येण्याची शक्यताही दिसत नाही, तर काळानुसार त्याची लक्षणे, स्वरूप आणि पद्धती (New Corona Symptoms) बदलत आहेत.

दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील ऑर्थोपेडिक्सचे प्राध्यापक डॉ. सतीश कुमार म्हणतात की, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना व्हायरस हा असा आजार झाला आहे की, संसर्ग झाल्यानंतर शरीरातील जवळपास सर्व अवयव प्रभावित होऊ शकतात. कोविड इफेक्टनंतर कोरोनामुळे हाडांनाही इजा झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यांच्यात काही लक्षणे बदलली आहेत.

डॉ. सतीश सांगतात की, कोरोनाच्या नवीन रुग्णांवर बारकाईने नजर ठेवल्यानंतर 3 मोठे बदल दिसत आहेत. यातील पहिला बदल कोरोनाच्या इन्‍क्‍यूबेशन पीरियडमध्ये, म्हणजेच त्याच्या संसर्गाच्या कालावधीशी संबंधित आहे. दुसरा बदल कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या पूर्ण बरे होण्याबाबत आहे. तिसरा बदल जो प्रत्येकामध्ये दिसत नाही, परंतु काही रुग्णांमध्ये घशात वेदना होत आहेत, काहींमध्ये या वेदना तीव्र स्वरुपाच्या आहेत. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये, कोणतीही लक्षणे नसल्यामुळे कोणताच बदल कमी दिसतो किंवा अजिबात दिसत नाही.

कोरोना रुग्णांमधील पहिला बदल -

डॉ. सतीश सांगतात की, आता येणाऱ्या नवीन रुग्णांमध्ये पहिला बदल त्याच्या इन्‍क्‍यूबेशन पीरियडबाबत दिसत आहे. इन्‍क्‍यूबेशन पीरियड म्हणजेच कोरोना संक्रमित किंवा विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर किती दिवसांनी दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो. दुसऱ्या आणि पहिल्या लाटेतील रुग्णांमध्ये असे दिसून आले होते की, जर एखादी व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली तर 5-7 दिवसांत कोरोनाची लक्षणे त्याच्यात दिसू लागतात, परंतु आता त्याचा कालावधी काहीसा वाढलेला दिसत आहे. काही रुग्णांमध्ये असे दिसून आले आहे की विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 8-10 दिवसांनी त्यांच्यामध्ये कोरोनाची पुष्टी होत आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, व्हायरस लोकांना संक्रमित करण्यासाठी अधिक मेहनत घेत आहे आणि कदाचित त्यामुळेच कोरोनाचा इन्‍क्‍यूबेशन पीरियड वाढत आहे.

कोरोना रुग्णांमधील दुसरा बदल -

डॉ. सतीश सांगतात की, कोरोना विषाणूच्या सुरुवातीच्या काळात 14 दिवसांत रुग्ण बरा होत असे. कधीकधी हा कालावधी गंभीर रुग्णांमध्ये 14-21 दिवसांचा असतो. या कालावधीपर्यंत लोक या आजारातून बरे होत होते. जरी आता कोरोनाचा संसर्ग हा खूप सौम्य किंवा लक्षणे नसलेला असला, तरी सुमारे 1 महिन्यापर्यंत रुग्णांमध्ये अशक्तपणा किंवा वेदना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांच्या त्रासात घट होत असली तरी थकवा, वेदना ही लक्षणे जवळपास महिनाभर कायम असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पूर्णपणे निरोगी होण्यासाठी आणि तंदुरुस्त होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागत असल्याचे निरीक्षण आहे.

हे वाचा - पिंपल्स, काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा रस आहे फायदेशीर; असा करा घरगुती उपाय

कोरोना रुग्णांमध्ये तिसरा बदल -

सतीश कुमार सांगतात की, कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्येही घसा दुखण्याच्या तक्रारी येत आहेत. तसे, कोरोनाच्या सुरुवातीपासूनच घसा खवखवणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. आवाजात बदल होणे, घशात दुखणे किंवा जड होणे या रुग्णांसाठी समस्या होत्या, परंतु आता जे रुग्ण पुढे येत आहेत ते सांगतात की, त्यांना घशात कोणीतरी दाबून ठेवल्यासारखे किंवा गुदमरल्यासारखे वाटत आहे. अनेकदा घशात दुखण्याबरोबरच घसा बंद होण्याचा त्रास जाणवतो आणि बोलायलाही त्रास होतो, असे काही रुग्णांचे म्हणणे आहे. ही बाब मात्र घाबरवणारी आहे.

हे वाचा - 20 ते 25 वर्षांच्या तरुणांनी आहारात घ्यावेत हे पदार्थ; राहाल दीर्घायुष्य निरोगी

अशी काळजी घ्या, संरक्षण करा -

डॉ. सतीश म्हणतात की, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये, ओमिक्रॉनच्या उप-प्रकारांचा संसर्ग सध्या आढळून येत आहे. इतकेच नाही तर रोज येणाऱ्या सर्व रुग्णांमध्येही अशीच लक्षणे आढळत नाहीत. काही लक्षणे नसलेली असतात, काहींना सौम्य लक्षणे असतात, तर काही रुग्णांना सौम्य गंभीर लक्षणे असतात. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मृतांची संख्या खूपच कमी आहे. यामागे कोरोना संसर्गापासून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आणि लसीकरणाची महत्त्वाची भूमिका आहे. तरी लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. सामाजिक अंतर पाळा. कोरोनाशी लढण्याची क्षमता असूनही शरीराला त्याचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे प्रतिबंधाचे नियम पाळा.

First published:

Tags: Corona, Corona updates, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus