कोलकाता, 1 मार्च : चहा म्हटलं की अनेकांचा चेहरा आनंदाने खुलतो. देशात कुठेही जा आपल्याला पावलोपावली चहाप्रेमी भेटतील. अनेकांची तर चहा घेतल्याशिवाय सकाळच होत नाही. कॉलेज असो किंवा ऑफिस चहाचा एक कप झाल्याशिवाय शरीरात तरतरी येत नाही. अनेक चहाप्रेमी दिवसातून 6 ते 7 कप चहा फस्त करतात. त्यामुळेच आज चहाच्या व्यवसायाला चांगलाच जोर मिळाला आहे. जागो-जागी आपल्याला टी-स्टाॅल दिसून येतात. पण याच चहासाठी जर तुम्हाला 1000 रुपये खर्च करावे लागले तर, काय बसला ना धक्का?
मात्र साधारणपणे 5 ते 10 रुपयांपर्यंत आपल्याला चहा मिळतो आणि आपण आनंदाने चहासाठी पाच-दहा रुपये खर्चही करतो. जास्तीत-जास्त 15 किंवा 20 रुपयांपर्यंत आपण चहासाठी खर्च करायला तयार असतो. ऐकलाय का कधी हजार रुपयांचा चहा? तोही टपरीवरचा? चहाच्या फक्त एका कपसाठी तब्बल 1000 रुपये मोजावे लागतात, हो हे खरं आहे. कोलकत्यामधील एका टी- स्टाॅलवर एका कप चहासाठी चक्क 1000 रुपये द्यावे लागतात.
कोलकत्तामधील मुकुंदपूर येथे राहणाऱ्या पार्थ प्रतीम गांगुली या तरुणाने 2014 मध्ये चहाचा व्यवसाय सुरु केला आहे. याठिकाणी तो विविध प्रकारचे चहा तयार करतो. ‘निर्जश’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या टी- स्टाॅलवर 12 रुपयांपासून ते तब्बल 1000 रुपयांपर्यंतचा चहा उपलब्ध आहे.
(हे पाहा: ऐन तारुण्यात कॅन्सरनं गाठलं; 7 वर्षे लढा देत पुणेकर तरुणी बनली यशस्वी बिझनेसवुमन )
फारच निराळा आहे हा चहा ;
पार्थ याठिकाणी 100 विविध पद्धतीचे चहा तयार करतो. मात्र हा 1000 रुपये किंमतीचा चहा थोडा खास आहे. हा चहा Bo-Lay चहा आहे.त्याची किंमत 3 लाख रुपये प्रती किलो अशी असते. त्यामुळे साहजिकच या चहाच्या कपची किंमतसुद्धा जास्त असते. तसेच याठिकाणी सिल्वर नीडल व्हाईट टी, व्हॅली टी, हिबिस्कस टी, वाईन टी, जिंजर टी अशा जवळजवळ 100 प्रकारचे चहा उपलब्ध आहेत.
पार्थ हा एका कंपनीत काम करत होता. त्यानंनतर त्याच्या डोक्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली आणि मग त्याने हा चहा व्यवसाय सुरू केला. आणि तो यशस्वीसुद्धा ठरला. 'निर्जश’ चहा आज पश्चिम बंगालच्या राजधानीमध्ये एक प्रसिद्ध चहा म्हणून ओळखला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Kolkata, Tea