Home /News /career /

महत्त्वाची बातमी! ऑफिसमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका; अन्यथा धोक्यात येऊ शकतं तुमचं करिअर

महत्त्वाची बातमी! ऑफिसमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका; अन्यथा धोक्यात येऊ शकतं तुमचं करिअर

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या ऑफिसमध्ये बोलल्यामुळे तुमचं करिअर धोक्यात येऊ शकतं.

    मुंबई, 16 ऑगस्ट: सध्या सर्वत्र कोरोनानं थैमान (Corona) घातलं आहे. यामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. काही लोकांना आपला जॉब कोरोनामुळे गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये आत्मविश्वासानं  (Confidence) हातात असलेली नोकरी (Latest jobs) टिकवून ठेवणं आणि चांगलं काम करत राहणं आवश्यक आहे. मात्र असं प्रत्येकालाच जमेल असं नाही. काही लोकं अतिउत्साहात ऑफिसमध्ये अतिआत्मविश्वास (Over Confidence) दाखवतात तर काही लोकं नकारत्मक बोलून स्वतःचा प्रभाव कमी करतात. अंतर या दोन्ही गोष्टींमुळे तुमचं करिअर धोक्यात (Career in danger) येऊ शकतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या ऑफिसमध्ये बोलल्यामुळे तुमचं करिअर (Things which should avoid in office) धोक्यात येऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया. 'हे काम मला जमणार नाही' 'प्रयत्नांती परमेश्वर' हे आप नेहमीच ऐकत आलो आहे. म्हणजेच प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये वरिष्ठांनी कुठलंही काम सांगितलं तर 'मला हे काम जमणार नाही' असं चुकूनही म्हणू नका. यामुळे तुमचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. याऐवजी "मला हे काम कठीण वाटतं आहे पण मी मेहनत करून हे काम पूर्ण करून राहीन" असं म्हणा. यामुळे तुमच्यातील जिद्द दिसून येईल. 'हे अशक्य आहे' या जगात अशक्य असं काहीच नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये कोणतंही काम सांगितल्यावर 'हे अशक्य आहे'  असं म्हणू नका. याऐवजी ते काम पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करा. हे वाचा - रात्रभर अभ्यास करण्याचा विचार करताय? 'या' टिप्सचा करा वापर; कधीच येणार नाही झोप 'बहुतेक असं असावं' ऑफिसमध्ये नेहमीच अशी वेळ येते ज्यावेळी सर्वजण कोणत्याही विषयावरून संभ्रमात असतात. अशावेळी 'बहुतेक असं असावं मात्र मी ठामपणे सांगू शकत नाही' असं म्हणू नका. यामुळे तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. त्यामुळे जर तुम्ही ठाम नसाल तर त्यावर बोलणं टाळा किंवा निर्णय झाल्यानंतर बोला. 'हे काम माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही' ऑफिसमध्ये बॉसनं तुमच्यावर विश्वास ठेऊन एखादं काम तुम्हाला दिलं तर अतिआत्मविश्वासात येऊन 'हे काम माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही' असं म्हणू नका. ते काम करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल तरी शांतपणे काम पूर्ण करा. अतिआत्मविश्वास धोक्याचा ठरू शकतो. 'सॉरी' जर ऑफिसमध्ये आपल्याकडून काही चूक झाली असेल तर जरुर सॉरी म्हणा. मात्र प्रत्येक गोष्टीला सॉरी म्हणू नका. दरवेळी विनाकारण सॉरी म्हण्टल्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे आणि तुम्ही घाबरलेले आहात असं वाटू शकतं. म्हणून गरज असेल तिथेच सॉरी म्हणा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career in danger

    पुढील बातम्या