नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीने (Liv-In Relationship) आपल्या प्रियकराला जाळून मारल्याची घटना नुकतीच फरीदाबादमध्ये उघडकीला आली आहे. संबंधित व्यक्तीचा अर्धवट जळलेला मृतदेह 10 दिवसांपूर्वी सापडला होता; मात्र तो नेमका कोणाचा आहे, याबद्दलचा शोध सुरू असताना हा गुन्हा उघडकीस (Murder Mystery) आला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मृत व्यक्ती वल्लभगडमधल्या (Vallabhgad) भाटिया कॉलनीतली असल्याचं उघड झालं असून, त्या व्यक्तीचं नाव पवन असं आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीवर त्याला जाळून मारल्याचा आरोप असून, पोलिसांनी केलेल्या चौकशीत या गुन्ह्याबद्दलची अधिक माहिती उघड झाली आहे. आरोपी महिला मूळची पंजाबमधली आहे. तिचा पती फरीदाबाद आयएमटी इथल्या एका खासगी कंपनीत नोकरीला होता. 2018 मध्ये ब्लड कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला. 2019 साली त्याच्या पत्नीला (म्हणजेच या प्रकरणातल्या आरोपी महिलेला) पतीच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. त्याच वर्षी पवनशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांचं प्रेम जमलं आणि ती दोघंही वल्लभगडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. दरम्यान, तिच्या 13 वर्षांच्या मुलीकडे पवन वाईट नजरेने पाहू लागल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर त्या दोघांमध्ये या विषयावरून वाद झाला. त्याचं रूपांतर पुढे भांडणात झालं. त्यानंतरच त्या महिलेने पवनच्या हत्येची योजना आखली. त्यासाठी तिने बाटलीत पेट्रोल घेऊन ठेवलं. हे वाचा- जेवणात एकच चपाती दिल्याने चिमुकल्यांचा घेतला घास; भावाच्या कृत्याने जळगाव हादरलं 16 ऑक्टोबरला महिलेने पवनला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्या अवस्थेत ती त्याला घेऊन ऑटोमधून बराच वेळ फिरत राहिली. रात्री 10.30 वाजता सेक्टर 75मधल्या एका सुनसान जागी नेऊन तिने मध्यरात्री 12.30च्या दरम्यान पवनवर पेट्रोल ओतून त्याला जाळलं आणि तिथून फरार झाली (Woman Killed Live-In Partner). झी न्यूज हिंदी ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. ती नायजेरियन व्यक्ती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू होता. कुरियर कंपनीत काम करणारा पवन 16 ऑक्टोबरला सकाली सहा वाजता घरातून बाहेर पडला होता आणि तो परत आला नसल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा मोठा भाऊ जितेंद्र याने 18 ऑक्टोबरला वल्लभगड पोलिस ठाण्यात दिली होती. जितेंद्रला पवनची एका महिलेसोबत मैत्री असल्याची माहिती असल्याने त्याने त्या महिलेला फोन करून चौकशी केली. तेव्हा तिने सांगितलं, की तो तिच्याकडे गेला होता; मात्र त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता लॅपटॉप आणि गाडी आपल्याकडेच ठेवून तो निघून गेला, अशी माहिती तिने त्याला दिली. हे वाचा- ST डेपोत उभ्या बसला गळफास घेत चालकाची आत्महत्या, घटनेने खळबळ दरम्यान, पोलीस आयुक्त विकास अरोरा यांनी पवनचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. क्राइम ब्रँच 65 आणि वल्लभगड पोलीस ठाण्यातल्या पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झालं, की संबंधित मृतदेह पवनचाच आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. तपासासाठी सीसीटीव्ही फूटेज, वैज्ञानिक पैलू आणि खबऱ्यांनी दिलेली माहिती यांचा आधार घेण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.