मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

'त्याला जगायचंच नव्हतं' पहिल्यांदा वाचला पण दुसऱ्यांदा नियतीनं गाठलं; शेतकऱ्याचा हृदयद्रावक शेवट

'त्याला जगायचंच नव्हतं' पहिल्यांदा वाचला पण दुसऱ्यांदा नियतीनं गाठलं; शेतकऱ्याचा हृदयद्रावक शेवट

काडगोंडा महादेव खडके असं आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. (फोटो-लोकमत)

काडगोंडा महादेव खडके असं आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. (फोटो-लोकमत)

Farmer Suicide in Kolhapur: कोल्हापुरातून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आपल्या जीवनाचा हृदयद्रावक शेवट केला आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 26 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आपल्या जीवनाचा शेवट (Farmer commits suicide by jumping into well) केला आहे. संबंधित शेतकऱ्याने एक वर्षांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to suicide by drinking poison) केला होता. पण त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला होता. पण यावेळी मात्र नियतीनं देखील डाव साधला आहे. संबंधित शेतकऱ्याने गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काडगोंडा महादेव खडके असं आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव असून ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता देखील आहेत. मृत खडके यांनी शनिवारी रात्री उशिरा घरातून बाहेर पडून गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी विहिरीत त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या तरुणीचं धाडस; बिबट्याचं डोकं फोडून केली स्वत:ची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत काडगोंडा हे अल्पभूदारक शेतकरी असून त्यांच्याकडे 10 गुंठे इतकीच शेतजमीन आहे. पण मागील काही दिवसात आलेल्या सलग दोन महापुरामुळे त्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांनी शेती आणि घरखर्चासाठी बँक आणि पतसंस्थेकडून काही कर्ज घेतलं होतं. तसेच काही ओळखीच्या लोकांकडून हातउसने पैसे देखील घेतले होते. त्यांच्यावर दोन लाखांहून अधिकचं कर्ज होतं. डोक्यावरील कर्जाची परतफेड कशी करायची? हा प्रश्न त्यांना सतावत होता.

हेही वाचा-नवरा घरी नसताना घडलं विपरीत; विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, कोल्हापुरातील घटना

आर्थिक विवंचनेतून त्यांना नैराश्य आलं होतं. यातूनच त्यांनी शनिवारी रात्री गावातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत काडगोंडा यांनी एक वर्षापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी ते बचावले होते. यावेळी मात्र नियतीने डाव साधला आहे. या घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Farmer, Kolhapur, Suicide