जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / थरारक घटना! मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या तरुणीचं धाडस; बिबट्याचं डोकं फोडून केली स्वत:ची सुटका

थरारक घटना! मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या तरुणीचं धाडस; बिबट्याचं डोकं फोडून केली स्वत:ची सुटका

वृषाली नीळकंठराव ठाकरे असं बिबट्याने हल्ला केलेल्या तरुणीचं नाव आहे.  (फोटो -लोकमत)

वृषाली नीळकंठराव ठाकरे असं बिबट्याने हल्ला केलेल्या तरुणीचं नाव आहे. (फोटो -लोकमत)

यवतमाळमधील एका तरुणीवर बिबट्याने हल्ला (leopard attack on young woman) केला असता, तिने स्वत:ची मान बिबट्याच्या जबड्यात असूनही प्रतिहल्ला करत, स्वत:ची सुटका करून घेतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

महागाव, 26 ऑक्टोबर: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे एक थरारक घटना घडली आहे. येथील एका तरुणीवर बिबट्याने हल्ला (leopard attack on young woman) केला असता, संबंधित तरुणीनं जगण्याची जिद्द न हरता, बिबट्यावरच प्रतिहल्ला केला आहे. झटापटीत तरुणीने बिबट्याच्या डोक्यावर कळशीने एका पाठोपाठ एक अनेक वार केले. यामुळे बिथरलेल्या बिबट्याने तरुणीची मान जबड्यातून सोडून जंगलात पोबारा केला आहे. तरुणीनं धाडस दाखवल्याने तिचा जीव वाचला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून तिला पुसद येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. संबंधित घटना यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील करंजखेड शिवारात घडली आहे. तर संबंधित मुलीचं नाव वृषाली नीळकंठराव ठाकरे असून ती करंजखेड येथील रहिवासी आहे. जखमी वृषाली ही फार्मसीची विद्यार्थिनी असून सोमवारी आईसोबत आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. काम सुरू असताना पिण्याचं पाणी आणण्यासाठी वृषाली एकटीच शेताजवळच्या ओढ्यावर गेली होती. कळशी भरून पाणी घेऊन परत येत असताना, पाठीमागून बिबट्याने अचानक वृषालीवर हल्ला केला. हेही वाचा- बापरे! सुपारी समजून अडकित्त्याने फोडला गावठी बॉम्ब; महिलेची झाली भयंकर अवस्था बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे काही कळायच्या आत वृषालीची मान बिबट्याच्या जबड्यात गेली. बिबट्यासोबत झालेल्या झटापटीतही वृषालीने प्रसंगावधान दाखवत, हातातील कळशीने बिबट्याच्या डोक्यावर एका पाठोपाठ एक वार केले. तीन-चार दणके बिबट्याच्या कपाळावर बसल्यानंतर बिबट्या जेरीस आला आणि भांबावून गेला. काही सेकंदाच्या थरारानंतर बिबट्याने माघार घेतली आणि वृषालीची मान जबड्यातून सोडली. यानंतर बिबट्याने जंगलाच्या दिशेनं पोबारा केला. हेही वाचा- नवरा घरी नसताना घडलं विपरीत; विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, कोल्हापुरातील घटना या झटापटीत वृषालीच्या अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. तसेच पायाला मोठी दुखापत झाली आहे. ही उघडकीस येताच, आसपासच्या लोकांनी त्वरित तिला पुसद येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जखमी वृषाली ही पुसद येथे फार्मसीचं शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती आपल्या आईला शेतीच्या कामात मदतही करते. सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने तीही आपल्या आईसोबत शेतात गेली होती. तेव्हाच ही थरारक घटना घडली आहे. वृषालीच्या धाडसाची गावात सर्वत्र चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात