मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /नवरा घरी नसताना घडलं विपरीत; विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, कोल्हापुरातील घटना

नवरा घरी नसताना घडलं विपरीत; विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, कोल्हापुरातील घटना

 गीता शिवलिंग नवलाज असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. (फोटो- लोकमत)

गीता शिवलिंग नवलाज असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. (फोटो- लोकमत)

Crime in Kolhapur: कोल्हापुरमध्ये एका 25 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह (Woman dead body found in well) एका विहिरीत आढळल्याची घटना घडली आहे.

गडहिंग्लज, 25 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील कुंबळहाळ येथील एका विहिरीत एका 25 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह (Woman dead body found in well) आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. घरी कोणीच नसताना पीडित महिलेनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (woman commits suicide by jumping into well) केली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. विहिरीचील पाणी उपसून महिलेचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

संबंधित महिलेनं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. गीता शिवलिंग नवलाज असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गीताचा मृतदेह घराजवळील एका विहिरीत आढळला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-बापरे! सुपारी समजून अडकित्त्याने फोडला गावठी बॉम्ब; महिलेची झाली भयंकर अवस्था

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गीता यांचा पती शिवलिंग नवलाज हा रविवारी सकाळी उसतोडणीसाठी घरातून लवकर बाहेर पडला होता. तसेच मृत गीता यांचे सासरे देखील कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान गीता एकट्याच घरी होत्या. यावेळी त्यांनी घराजवळील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

हेही वाचा-23 व्या वर्षी केली 40 रुपयांची चोरी; 42 वर्षांनंतर कोर्टाकडून निर्दोष सुटका

दरम्यान, नवरा आणि सासरे घरी आल्यानंतर त्यांनी गीता यांची सर्वत्र शोधाशोध केली. पण त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी विहिरीत उडी घेत, आत्महत्या केली असावी, असा संशय आला. विहिरीतील पाण्याचा उपसा केला असता, गीता यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला आहे. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Suicide