Home /News /kolhapur /

बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्...; कोल्हापुरात इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू

बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्...; कोल्हापुरात इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू

याच इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. (फोटो-लोकमत)

याच इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. (फोटो-लोकमत)

Crime in Kolhapur: बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मसाज पार्लरमध्ये (Illegal massage parlor) खंडणी मागायला आलेल्या तिघांच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू (Woman dies after falling from third floor) झाला आहे.

    कोल्हापूर, 13 ऑक्टोबर: बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मसाज पार्लरमध्ये (Illegal massage parlor) खंडणी मागायला आलेल्या तिघांच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू (Woman dies after falling from third floor) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मसाज पार्लरमध्ये येत एक लाख रुपये द्या, अन्यथा पोलिसांना बोलवू अशी धमकी (Threat to call police) दिली होती. त्यामुळे समाजात बदनामी होईल या भितीने बदनामीपासून वाचण्यासाठी गॅलरीत लपायला गेलेल्या एका महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिन्ही खंडणीखोरांना अटक केली आहे. रवी गोविंद कांबळे, सुहास भगवान पोवार आणि नवाज जबीर शेख असं अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. यापैकी रवी कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. तर शोभा वसंत कांबळे असं मृत महिलेचं नाव असून त्या जवाहरनगर येथील रेणुका मंदिर परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तवणाप्पा पाटणे हायस्कूल रोडवरील राजारामपुरी 11 गल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर सुरू होतं. याठिकाणी 'विश्रांती वेलनेस स्पा'च्या नावाखाली अवैध पद्धतीने मसाज पार्लर सुरू होतं. हेही वाचा-राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला सॉफ्टवेअर अभियंता; पुण्यातील खळबळजनक घटना दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास या पार्लरवर तिघे आरोपी आले होते. आरोपींनी मसाज पार्लर चालक महिलेकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास पोलिसांना बोलवू अशी धमकी दिली. यामुळे मसाज पार्लर चालक महिलेचा तिघां खंडणीखोरांसोबत वाद झाला. यानंतर आरोपींनी पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली. आरोपींच्या धमकीला घाबरून संबंधित महिला गॅलरीमध्ये लपायला गेली. दरम्यान तिसऱ्या मजल्यावरून फुटपाथावर कोसळल्यामुळे संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. खरंतर, मृत महिलेच्या मुलीचं काही दिवसांपूर्वी लग्न ठरलं होतं. आपली बदनामी झाली तर मुलीचं लग्न मोडेल या भितीने त्या गॅलरीत लपायला गेल्या होत्या. यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हेही वाचा-देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघतात तिघांचा मृत्यू ही घटना घडताच मसाज पार्लर चालक महिला तातडीने धावत फ्लॅटमधून बाहेर पडली आणि तिन्ही खंडणीखोरांना फ्लॅटमध्ये कोंडलं. या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन खंडणीखोर तरुणांसोहत मसाज पार्लर चालक महिलेस अटक केली आहे. अन्य दोन महिलांची पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या