Home /News /aurangabad /

देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; कार बंधाऱ्यात कोसळून सासू-सासरे अन् सुनेचा मृत्यू

देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; कार बंधाऱ्यात कोसळून सासू-सासरे अन् सुनेचा मृत्यू

वैजिनाथ उमाजी चौधरी (वय-52), मंगल वैजिनाथ चौधरी (वय-45) आणि सुकन्या मधुर चौधरी (वय-22) असं मृत पावलेल्या तिघांची नावं आहेत. (फोटो-दिव्य मराठी)

वैजिनाथ उमाजी चौधरी (वय-52), मंगल वैजिनाथ चौधरी (वय-45) आणि सुकन्या मधुर चौधरी (वय-22) असं मृत पावलेल्या तिघांची नावं आहेत. (फोटो-दिव्य मराठी)

देवीच्या दर्शनासाठी जात असताना, कार बंधाऱ्यात पडल्याने (car crashed into embankment) सासू-सासरे आणि सुनेचा नाका-तोंडात पाणी शिरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    औरंगाबाद, 13 ऑक्टोबर: एकलहरा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला (car accident while going to visit goddess) आहे. देवीच्या दर्शनासाठी जात असताना, कार बंधाऱ्यात पडल्याने (car crashed into embankment) सासू-सासरे आणि सुनेचा नाका-तोंडात पाणी शिरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू (3 died from same family) झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. बंधाऱ्याला सुरक्षेसाठी कोणत्याही  उपाययोजना नसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी 25 अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास अथक मेहनत करून अपघातग्रस्त कार पाण्यातून बाहेर काढली आहे. वैजिनाथ उमाजी चौधरी (वय-52), मंगल वैजिनाथ चौधरी (वय-45) आणि सुकन्या मधुर चौधरी (वय-22) असं मृत पावलेल्या तिघांची नावं आहेत. संबंधित सर्वजण औरंगाबाद येथील सेलूद परिसरातील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत वैजिनाथ मंगळवारी दुपारी आपल्या कारने पत्नी आणि सुनेला घेऊन एकलहरा देवीच्या दर्शनासाठी जात होते. जडगाव येथील नातेवाईकांना भेटून पुढे एकलहरा देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा त्यांचा बेत होता. हेही वाचा-राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला सॉफ्टवेअर अभियंता; पुण्यातील खळबळजनक घटना जडगाव (ता. औरंगाबाद) येथील नातेवाईकांना भेटल्यानंतर हे कुटुंब एकलहर देवीच्या दर्शनासाठी मार्गक्रमण झाले. दरम्यान मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास लाडगाव येथून जात असताना, जडगावच्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ वैजिनाथ याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट बंधाऱ्यात जाऊन पडली. अवघ्या क्षणार्धात घडलेल्या या अपघातामुळे कोणालाही सावरता आलं नाही. अशातही वैजिनाथ यांनी आपल्या कुटुंबीयांना मोबाइलवरून अपघात झाल्याची माहिती दिली. पुढच्या क्षणात त्यांचा मोबाइल बंद पडला. हेही वाचा-रात्री 2 वाजता घरात शिरून कॉन्स्टेबलचा महिलेवर Rape; नातेवाईकांनी दिला बेदम चोप बंधाऱ्यात 30 ते 40 फूट खोल पाणी असल्याने तिघांच्या नाकातोंडात पाणी शिरून तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 25 जवानांनी पाच तास अथक मेहनत केल्यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार पाण्यातून बाहेर काढली आहे. बंधाऱ्याला सुरक्षा भिंती नसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Car crash

    पुढील बातम्या