कोल्हापूर: फेसबुकवरील नेहानं दिला दगा; हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणानं संपवलं जीवन

कोल्हापूर: फेसबुकवरील नेहानं दिला दगा; हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणानं संपवलं जीवन

Suicide in Kolhapur: फेसबुकवर एका अनोळखी तरुणीसोबत मैत्री करणं कोल्हापुरातील एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 04 ऑक्टोबर: फेसबुकवर एका अनोळखी तरुणीसोबत मैत्री करणं कोल्हापुरातील एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. फेसबुकवरील तरुणीनं प्रेमाचं नाटक करत संबंधित तरुणाला हनी ट्रॅपमध्ये (Honey trap case) अडकवलं होतं. यानंतर सोशल मीडियावर बदनामी होईल या भीतीतून संबंधित तरुणानं आत्महत्या (Young man commits suicide) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणाचा मोबाइल तपासला असता, संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फेसबुकवरील नेहा शर्मा (Neha Sharma) नावाच्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी तरुणीचा शोध घेतला जात आहे.

आत्महत्या केलेल्या 35 वर्षीय मृत तरुणाचं नाव संतोष मनोहर निकम असून तो हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील रहिवासी आहे. मृत निकम हा यंत्रमाग कामगार होता. काही दिवसांपूर्वी संतोषला फेसबुकवर नेहा शर्मा नावाच्या एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर संबंधित तरुणीनं संतोषला भुरळ घालत आपल्या जाळ्यात ओढलं होतं. त्यानंतर दोघांनी एकमेकांना व्हॉट्सअॅप क्रमांक दिले होते. त्यानंतर तरुणीनं संतोषला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करायला सुरुवात केली.

हेही वाचा-बॅडमिंटन कोचकडून 14 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील संतापजनक प्रकार

यानंतर पीडित तरुणीनं संतोषला देखील कॅमेऱ्यासमोर नग्न होण्यास भाग पाडलं. दरम्यान आरोपी तरुणीनं संबंधित व्हिडीओ स्क्रिन रेकॉर्डींग (Record obscene video) केला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दहा हजार रुपयांची (Demand 10000 Rs) मागणी केली. बदनामीच्या भीतीनं संतोषनं आरोपी तरुणीला दोन हजार रुपये गुगल पे वरून पाठवले. पण आरोपी तरुणीनं पुन्हा फोन करून दहा हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न पाठवल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

हेही वाचा-नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी

आरोपी तरुणीच्या त्रासाला कंटाळून संतोषनं आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं. तरीही तरुणीनं पैशाची मागणी केली. शेवटी बदनामीच्या भीतीने संतोषने गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोषचा मोबाइल तपासला असता, आत्महत्येचं गूढ उलगडलं आहे. यानंतर पोलीस आता तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी तरुणीचा शोध घेत आहेत. आरोपी तरुणीने आपला मोबाइल बंद करून ठेवला आहे.

Published by: News18 Desk
First published: October 4, 2021, 11:04 AM IST

ताज्या बातम्या