Home /News /kolhapur /

रस्ता खचला अन् नशिबी आला एकांतवास; अडीच महिन्यांनतर पन्हाळ्यात अडकलेली एसटी डेपोत

रस्ता खचला अन् नशिबी आला एकांतवास; अडीच महिन्यांनतर पन्हाळ्यात अडकलेली एसटी डेपोत

(File Photo)

(File Photo)

जोरदार पावसामुळे अडीच महिन्यांपूर्वी पन्हाळ येथील एक रस्ता खचल्याने राज्य परिवहन महामंडळाची एक बस तिथेच अडकली (ST stuck in Panhala) होती.

    कोल्हापूर, 12 ऑक्टोबर: जोरदार पावसामुळे अडीच महिन्यांपूर्वी पन्हाळ येथील एक रस्ता खचल्याने राज्य परिवहन महामंडळाची एक बस तिथेच अडकली (ST stuck in Panhala) होती. अडीच महिने एकाच ठिकाणी उभं राहून एकांतवास भोगल्यानंतर, अखेर 9 ऑक्टोबर रोजी ही एसटी पुन्हा कोल्हापूर डेपोत परतली आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर, संबंधित एसटी सुरक्षित पद्धतीने कोल्हापूर एसटी डेपोत परत आणल्याने चालक आणि वाहकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. खरंतर, घटनेच्या दिवशी म्हणजेच 22 जुलैच्या रात्री पन्हाळा एसटी स्टॅण्डवर तीन एसटी बसेस मुक्कामी होत्या. यातील दोन एसटी सकाळी साडे सहा आणि सात वाजता कोल्हापूरच्या दिशेनं मार्गक्रमण झाल्या. पण 22 जुलै रोजी मुक्कामी असलेल्या गाड्यांपैकी एमएच-09 एस 8956 ही बस साडे सात वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी निघणार होती. पण सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे चार दरवाजा प्रवासी कर नाक्याजवळ रस्ता खचल्याने ही बस पन्हाळ्यातचं उडकून पडली. हेही वाचा- अभ्यास ठरलं अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं कारण; कोल्हापुरातील हृदय हेलावणारी घटना रस्ता खचल्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून संबंधित एसटी एकाच जागी उभी होती. संबंधित एसटीतील नागरिकांना दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी पोहोचवलं. पण हा एकमेव मार्ग असल्यानं संबंधित एसटी तिथेच अडकून पडली. या एसटीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेडेघाटी मार्गे तात्पुरता रस्ता करण्याचं ठरलं. अनेक परवानग्या काढल्यानंतर याठिकाणी तात्पुरत्या पद्धतीचा रस्ता बनवला आहे. हेही वाचा-11वेळा निवडणूक लढवूनही अपयश; आता विद्यमान सरपंचामुळे आजोबांचं स्वप्न होणार पूर्ण पावसाचा जोर कमी झाल्यानंतर अखेर हा रस्ता दुचाकी आणि हलक्या चारचाकी वाहनांसाठी तयार झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहाणी केल्यानंतर, संबंधित गाडी डेपोलो घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी मेकॅनिकने आवश्यक ती दुरुस्ती करून गाडी सुरू केली. त्यानंतर गड उतरून ही बस कोल्हापूरकडे रवाना झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kolhapur, ST

    पुढील बातम्या