मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

11 वेळा निवडणूक लढवूनही अपयश; आता विद्यमान सरपंचामुळे 92 व्या वर्षी आजोबांचं स्वप्न होणार पूर्ण

11 वेळा निवडणूक लढवूनही अपयश; आता विद्यमान सरपंचामुळे 92 व्या वर्षी आजोबांचं स्वप्न होणार पूर्ण

बापू कांबळे असं संबंधित 92 वर्षीय आजोबांचं नाव आहे. (फोटो-एबीपी)

बापू कांबळे असं संबंधित 92 वर्षीय आजोबांचं नाव आहे. (फोटो-एबीपी)

कोल्हापुरातील 92 वर्षीय आजोबा गेल्या 60 वर्षांपासून सरपंच पदाची निवडणूक लढवूनही (contest gram panchayat election for 11 times) त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. पण विद्यमान सरपंचामुळे त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 08 ऑक्टोबर: मनाशी बाळगलेलं एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची करतात. आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून योग्य दिशेनं कष्ट घेतले की, आपसुकच यश मिळतं. पण काही वेळा अनेक प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही. कोल्हापुरातील एका 92 वर्षीय आजोबांसोबत देखील असंच काहीसं घडलं आहे. संबंधित आजोबा गेल्या जवळपास 60 वर्षांपासून सरपंच पदाची निवडणूक लढवत आहेत. तब्बल अकरा वेळा निवडणूक लढवूनही (contest gram panchayat election for 11 times) त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही.

पण आता गावाच्या विद्यमान सरपंचामुळे या 92 वर्षीय आजोबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर संबंधित आजोबांना 9 दिवसांसाठी गावचा सरपंच म्हणून कारभार सांभाळता येणार आहे. गावातील नागरिकांनी आणि विद्यमान सरपंचांनी आपलं मन मोठं केल्यानं, संबंधित वयोवृद्धाचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

हेही वाचा-Kolhapur Job Alert: यशवंतराव चव्हाण महाविदयालय इथे 36 जागांसाठी होणार पदभरती

बापू कांबळे (Sarpanch Bapu Kamble) असं संबंधित 92 वर्षीय आजोबांचं नाव असून ते कोल्हापुरजवळील एका गावातील रहिवासी आहेत. कांबळे हे 1962 सालापासून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत आहेत. ते तब्बल अकरा वेळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिले. पण गावकऱ्यांनी त्यांच्यावर फारसा विश्वास दाखवला नाही. ते अकरा वेळा निवडणुकीत पराभूत झाले. आता ते आयुष्याच्या शेवटाकडे पोहोचले आहेत. पण त्यांची गावचा सरपंच होण्याची इच्छा अधुरीच राहिली आहे.

हेही वाचा-चहासाठी बाप बनला राक्षस; चिमुकल्याला आधी भिंतीवर आपटलं मग छातीत मारला ठोसा

92 वर्षीय आजोबांनी संपूर्ण आयुष्यभर सरपंच होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं पण इच्छा अपूर्ण राहिली. यामुळे गावातील विद्यमान सरपंच आणि गावकऱ्यांनी ठरवून बापू कांबळे यांना 9 दिवसांसाठी सरपंच पद देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी राज्य सरकारच्या परवागनीनंतर, कांबळे यांना 9 दिवसांसाठी सरपंच पद देण्यात येणार आहे. यामुळे 92 व्या वर्षी संबंधित आजोबाचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

First published: