मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

शरद पवारांचा नवा प्लॅन, आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी 'कोल्हापूर पॅटर्न'

शरद पवारांचा नवा प्लॅन, आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी 'कोल्हापूर पॅटर्न'

भाजपला रोखण्यासाठी कोल्हापूर पोटनिवडणुकीतला फॉर्म्युला यशस्वी झाल्याने आगामी निवडणुका सुद्धा एकत्रित लढण्याची तयारी महाविकास आघाडी करत आहे.

भाजपला रोखण्यासाठी कोल्हापूर पोटनिवडणुकीतला फॉर्म्युला यशस्वी झाल्याने आगामी निवडणुका सुद्धा एकत्रित लढण्याची तयारी महाविकास आघाडी करत आहे.

भाजपला रोखण्यासाठी कोल्हापूर पोटनिवडणुकीतला फॉर्म्युला यशस्वी झाल्याने आगामी निवडणुका सुद्धा एकत्रित लढण्याची तयारी महाविकास आघाडी करत आहे.

  • Published by:  sachin Salve

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी

कोल्हापूर, 10 मे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ( local elections ) कोल्हापूर पॅटर्नची (Kolhapur pattern ) जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपला रोखण्यासाठी कोल्हापूर पोटनिवडणुकीतला फॉर्म्युला यशस्वी झाल्याने आगामी निवडणुका सुद्धा एकत्रित लढण्याची तयारी महाविकास आघाडी करत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनीही सरकार म्हणून एकत्रित निवडणुका लढवण्याचा कल राष्ट्रवादीच्या अनेकांचा असल्याचे बोलून दाखवले आहे. त्यामुळे राजकीय चर्चना उधाण आले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या निकालात अडलेले निवडणुकीचे घोडे आता न्यायालयाच्या निकालानंतर गतिमान झाले आहे. 17 मे रोजी प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब करण्याचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर करत निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्रित लढणार की वेगळी याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

(मेहुणीसोबतच राहत होता भावोजी! दुसऱ्या पत्नीच्या भावाने चाकू भोसकून केली हत्या)

राष्ट्रवादीतही यावर चर्चा झाली असून त्यामध्ये दोन मतप्रवाह असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केलंय. सरकार म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणे फायद्याचे ठरेल असे काहींचे म्हणणे आहे तर निवडणुका वेगळ्या लढून सत्ता स्थापन करणे असे काहींचे मत आहे. मात्र यापैकी कोणत्या मुद्द्यावर जायचे याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

या दोन पर्यायापैकी एक पर्याय महाविकास आघाडीने कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत वापरला होता. त्याला यश आल्याने भाजपला रोखण्यासाठी हाच कोल्हापूर पॅटर्न महत्वाचा ठरेल असा काहींचा अंदाज आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र ही जागा काँग्रेसला एकमुखाने देत भाजपला धूळ चारण्याचे काम महाविकास आघाडीने करत देशात भाजपला हरवू शकतो हा संदेश दिला. त्यामुळे प्रत्येक पक्षाने मोजक्याच जागा लढून त्या जिंकून आणण्यावर महाविकास आघाडीचा भर दिसून येत आहे.

('मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना धमक्या', रवी राणांचा गंभीर आरोप)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर नेत्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राजकीय हालचाली सुद्धा वाढल्या आहेत. राजकीय आडाखे बांधत निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे याची सध्या चाचपणी सुरू आहे. या सगळ्या चाचपणीत कोल्हापूर पॅटर्नची जोरदार चर्चा दिसून येत आहे. महापालिकांच्या निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट ठरलेला हा पॅटर्न महाविकास आघाडी अमलात आणणार की बंडखोरीच्या भीतीने वेगवेगळ्या निवडणुका लढणार हे आता येणार काळच ठरवेल.

First published: