जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / मॉर्निंग वॉकला जाताच निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर डल्ला; भामट्यांनी पहाटेच लुटलं सोनं

मॉर्निंग वॉकला जाताच निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर डल्ला; भामट्यांनी पहाटेच लुटलं सोनं

मॉर्निंग वॉकला जाताच निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर डल्ला; भामट्यांनी पहाटेच लुटलं सोनं

Crime in Kolhapur: घराला बाहेरून कुलूप लावून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या (went for morning walk) घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना (robbery at retired officer’s house) उघडकीस आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 30 ऑक्टोबर: घराला बाहेरून कुलूप लावून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या (Retired officer went for morning walk) घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना (robbery at retired officer’s house) उघडकीस आली आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत तिजोरीतील 10 तोळे सोन्याचे दागिने लंपास (Theft 100 gram golden ornaments) केले आहेत. शुक्रवारी पहाटे साडेचार ते साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. संबंधित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून त्यांच्या शोधासाठी तीन पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत. दिलीप जानवेकर असं 67 वर्षीय फिर्यादीचं नाव असून ते महापालिकेतील निवृत्त अधिकारी आहेत. फिर्यादी जानवेकर हे आपल्या मुलाकडे सावंतवाडी येथे वास्तव्याला असतात. पण काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवासाठी जानवेकर कोल्हापुरला आले होते. यानंतर दिवाळीचा सण साजरा करूनच ते परत आपल्या मुलाकडे सावंतवाडीला जाणार होते. दरम्यान शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास जानवेकर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर गेले होते. हेही वाचा- दारूच्या नशेत आईसोबत भलतंच कृत्य; तरुणाने शेजाऱ्याचा गळा चिरून संपवलं मॉर्निंग वॉकसाठी जाताना जानवेकर यांनी आपल्या घराला बाहेरून कुलूप लावलं होतं. पण साडेपाच वाजता जानवेकर परत घरी आले, तर घराचं कुलूप तोडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तसेच चोरट्यांनी घरातील तिजोरी तोडून सोन्याचे दागिने देखील लंपास केले होते. जानवेकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी तिजोरीतील सहा तोळे सोनं, दीड तोळे वजनाची दोन गंठण, अर्धा तोळ्याचे पेंडन्ट, लहान मुलांच्या कानातील डूल असा एकूण 10 तोळ्यांचा ऐवज लंपास केला आहे. हेही वाचा- बायकोची हत्या करून पोलिसांना फिल्मी स्टाइल गुंगारा; प्रयत्न फसला अन् गजाआड झाला या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी आणि राजाराम पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन ठिकाणी चोरटे कैद झाले आहेत. अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकं तयार केली आहे. आरोपी भामट्यांचा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात