भंडारा, 29 ऑक्टोबर: भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 49 वर्षीय व्यक्तीची गळा चिरून हत्या (brutal murder by slitting throat) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीने आरोपी तरुणाच्या आईला शिवीगाळ केल्याच्या (neighbor abused mother ) रागातून तरुणाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीनं हत्या केल्यानंतर, स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (accused arrested) केली असून पुढील कारवाई केली जात आहे. गंगाधर उर्फ बंग्या नत्थु निमजे असं हत्या झालेल्या 49 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर आकाश विजय श्रीपाद असं आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी आणि मृत हे मोहाडी येथील गांधी वार्डात एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपी आणि मृताचं नेहमी एकमेकांच्या घरी येणं जाणं होती. दोन्ही कुटुंबाचे संबंध देखील चांगले होते. हेही वाचा- जेवणात एकच चपाती दिल्याने चिमुकल्यांचा घेतला घास; भावाच्या कृत्याने जळगाव हादरलं दरम्यान घटनेच्या दिवशी मृत गंगाधर निमजे याने मद्यपान करत आरोपी आकाशच्या घरी आला. यावेळी दारुच्या नशेत निमजे यांनी कोणतंही कारण नसताना आकाशच्या आईला शिवीगाळ केली. त्याला जाब विचारला असताना, त्याने घरासमोर उभ्या असलेल्या ओमनी कारची तोडफोड केली. गंगाधरच्या या कृत्याने संतापलेल्या आकाशने सायकलचा काटेरी कुंपण गेयर निमजे यांच्या गळ्यावर मारला. हा वार इतका भयंकर होता की निमजे घटनास्थळीच गतप्राण झाले. हेही वाचा- मध्यरात्री मुंबईत रंगला सायको किलरचा थरार; 15मिनिटात दगडाने ठेचून दोघांना संपवलं या घटनेनंतर आरोपी आकाश विजय श्रीपाद याने मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपीनं स्वत: आत्मसमर्पण केलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.