मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बायकोची हत्या करून पोलिसांना फिल्मी स्टाइल गुंगारा; प्रयत्न फसला अन् गजाआड झाला

बायकोची हत्या करून पोलिसांना फिल्मी स्टाइल गुंगारा; प्रयत्न फसला अन् गजाआड झाला

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Hingoli: वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील बेपत्ता झालेल्या महिलेचं गूढ पोलिसांनी उलगडलं आहे. संबंधित महिला बेपत्ता झाली नसून तिच्याच पतीने तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं (Husband killed wife) आहे.

हिंगोली, 29 ऑक्टोबर: वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील बेपत्ता झालेल्या महिलेचं गूढ पोलिसांनी उलगडलं आहे. संबंधित महिला बेपत्ता झाली नसून तिच्याच पतीने तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं (Husband killed wife) आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत टाकला (dead body thrown into well) होता. यानंतर स्वत:च पोलीस स्टेशन गाठत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली (file missing complaint) होती. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी आरोपी पतीच्या गुन्ह्याच्या पर्दाफाश करत त्याला जेरबंद केलं आहे.

बालाजी भगवान कुरुडे असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. तर कमल बालाजी कुरुडे असं हत्या झालेल्या 28 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कमल आणि आरोपी पती बालाजी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता. याच वादातून आरोपीनं मंगळवारी पहाटे पत्नी कमलचा गळा आवळून तिची हत्या केली होती.

हेही वाचा-जेवणात एकच चपाती दिल्याने चिमुकल्यांचा घेतला घास; भावाच्या कृत्याने जळगाव हादरलं

आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपीनं पत्नीचा मृतदेह शेतातील विहिरीत फेकून दिला. यानंतर घटनेच्या दिवशी आरोपी पती कुरुंदा पोलीस ठाण्यात जात, पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. घटनेच्या तपासाला सुरुवात केली. पण फिर्यादी पतीनेच कमल यांची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना बळावला.

हेही वाचा-जेवणात एकच चपाती दिल्याने चिमुकल्यांचा घेतला घास; भावाच्या कृत्याने जळगाव हादरलं

दरम्यान बुधवारी कमल यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. कमल यांचा गळा आवळून खून झाला असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. यामुळे पोलिसांनी आरोपी बालाजीला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी सुरू केली. यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. कुरुंदा पोलिसांनी गुरुवारी आरोपी पती बालाजीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime, Murder, Wife